लेक लाडकी या घरची... ईशा अंबानीच्या लग्नासाठी अँटिलियाला नववधूचा साज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 17:29 IST2018-12-11T17:17:50+5:302018-12-11T17:29:07+5:30

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी 12 डिसेंबर रोजी आनंद पिरामल यांच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे.

मुकेश अंबानी यांचं हे निवासस्थान म्हणजेच ईशा अंबानीचं माहेर असलेल्या अँटेलियामध्ये लगीनघाई सुरू आहे.

देशातील सर्वात महागड्या निवासस्थानांपैकी एक असलेलं अँटेलियाही एखाद्या नववधूप्रमाणे सजवण्यात आलं आहे.

27 माळ्यांच्या या घराचे मुख्य प्रवेशद्वार लाल रंगाच्या गुलाबांच्या फुलांनी सजवण्यात आलं आहे. एवढचं नाही तर गोल्डन कलरची रॅपिंगही करण्यात आली आहे.

फक्त फुलचं नाही तर ईशाच्या या शाही विवाहसोहळ्यासाठी अंबानीच्या घराला रोषणाई करण्यात आली आहे.

ईशाच्या पाठवणीसाठी अंबानींचं अँटेलिया सज्ज झालं आहे.