Mumbai monorail resumes today all you need to know before travelling
सात महिन्यांनंतर मोनो रेल धावली; आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल By कुणाल गवाणकर | Published: October 18, 2020 03:56 PM2020-10-18T15:56:18+5:302020-10-18T16:02:31+5:30Join usJoin usNext कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर जवळपास सात महिन्यांनंतर मोनो रेलची सेवा सुरू झाली आहे. कोरोनामुळे लागलेल्या ब्रेकनंतर आज अखेर मोनो रेल धावली. चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक मार्गावर मोनोरेल आजपासून सुरू झाली. मोनोरेलमध्ये सर्वांना प्रवेश असणार आहे. त्यामुळे बस सेवेवरील ताण काही प्रमाणात कमी होऊ शकेल. शनिवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनीदेखील मोनोरेल सुरु करण्यापूर्वीच्या कामाची पाहणी केली. राजीव यांनी वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा मोनोरेलने प्रवासदेखील केला. क्यूआर स्कॅनिंगची पाहणी करत कोरोना काळात प्रवास करताना प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. सुरुवातीला मोनोच्या दिवसाला १०० फेऱ्या होतील. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फेऱ्या वाढवण्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. मोनो रेल प्रशासनाला सेवा सुरू करण्याची परवानगी १५ ऑक्टोबरला देण्यात आली. कोरोना संकट येण्यापूर्वी मोनोरेलच्या दिवसभरात ११५ फेऱ्या होत होत्या. त्यातून ८०० प्रवासी प्रवास करत होते.Read in Englishटॅग्स :मोनो रेल्वेMono Railway