काही तासांच्या पावसाने मुंबईची झाली 'तुंबई': विमान, ट्रेन आणि बस सेवांवर झाला मोठा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 02:32 PM2021-07-16T14:32:00+5:302021-07-18T17:29:04+5:30

Heavy Raining In Mumbai : वडाळा, सायन आणि गांधी मार्केटसह शहरातील सखल भागात गुडघाभर पाणी साचले

मुसळधार पावसामुळे महापालिकेने बसच्या मार्गांमध्ये बदल केले. तसेच, रुळांवर पाणी साचल्यामुळे लोकल ट्रेनवरही मोठा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. (सर्व फोटो-दत्ता खेडेकर)

शहरातील जीटीएस नगरमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्यातूनच तरुणांना सायकल घेऊन जावं लागत आहे.

शहरातील षणमुखानंद हॉल मार्गावर साचलेल्या गुडघाभर पाण्यातून कार घेऊन जाताना नागरिक.

मुंबईतील गांधी मार्केट परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झालेले दृष्य पाहायला मिळत आहे. याच पाण्यातून नागरिकांना जावं लागतयं.

भर पावसामध्ये बसची वाटत पाहत असलेले नागरिक.

शहरातील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. याच पाण्यातन बसला मार्ग काढावा लागतोय.

पावसामुळे रस्त्यावर प्रचंड पाणी साचलंय. या पाण्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम होतोय.

भर पावसात मुंबईतील सायन परिसरातील बाजारातून सामान घेऊन जाताना नागरिक.

हा फोटो मुंबईतील गांधी मार्केटचा आहे. येथील अनेक सोसाइटीमध्ये पाणी साचले आहे.

भर पावसात सायकलवरुन सामान घेऊन जाताना नागरिक.