मुंबईतल्या मुसळधार पावसानं विमान सेवा प्रभावित, अनेक विमानांच्या मार्गात बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 18:37 IST2019-07-02T18:31:09+5:302019-07-02T18:37:41+5:30

मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसानं विमान सेवाही प्रभावित झाली.(सर्व छायाचित्र- सुशील कदम)
मुंबई विमानतळावर स्पाइस जेटचे विमान घसरल्याची घटना सोमवारी रात्री घडली, त्यामुळे आज दिवसभर स्पाइस जेटसह इतर विमान सेवा विस्कळीत झाली होती.
या घटनेनंतर मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली होती. त्यामुळे विमान उशिरानं उड्डाण करत होती. तसेच प्रवाशांचीही मोठी गर्दी झाली होती.
तसेच पर्यायी धावपट्टीवर विमाने उतरवली जात आहेत. तसेच अनेक विमानं उशिरानं उड्डाण घेत असल्यानं प्रवाशांनाही विमानतळावर ताटकळत बसावं लागत आहे.
काही आंतरराष्ट्रीय विमानांचा मार्ग बदलण्यात आला असून या विमानांना बंगळुरू, अहमदाबादासह दुस-या विमानतळावर वळविण्यात आली होती.