Mumbais iconic Victorian Gothic and Art Deco building gets UNESCO World Heritage tag
मुंबईची वाढली शान; 'या' वास्तूंना मिळाला जागतिक वारशाचा मान By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 04:39 PM2018-06-30T16:39:09+5:302018-06-30T17:11:36+5:30Join usJoin usNext दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन निओ गॉथिक आणि आर्ट डेको इमारतींचा समावेश युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुख्यालयाचा समावेश युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे. बहरीनमध्ये सुरू असलेल्या युनेस्कोच्या बैठकीत याबद्दलची घोषणा करण्यात आली. मरिन ड्राईव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारतींना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे. फोर्टमधील डेव्हिड ससून ग्रंथालयाला युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. चर्चगेट स्थानकासमोर असलेल्या इरॉस सिनेमाच्या वास्तूला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. एल्फिन्स्टन महाविद्यालयाचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या अत्यंत देखण्या वास्तूलाही जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. चर्चगेट स्थानकाच्या शेजारी असणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाचा समावेशदेखील जागतिक वारसा स्थळात करण्यात आला आहे.टॅग्स :मुंबईMumbai