Mumbais most expensive toilet is now open for public use
'या' ठिकाणी सुरू झालं मुंबईतील सर्वात महागडं टॉयलेट By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 10:13 PM2018-10-02T22:13:19+5:302018-10-02T22:16:56+5:30Join usJoin usNext मरीन ड्राईव्हवर आजपासून नवं टॉयलेट सुरू झालं आहे. हे मुंबईतील सर्वात महागडं टॉयलेट आहे. यासाठी 90 लाख रुपयांचा खर्च आला आहे. मुंबईतील सर्वात महागड्या टॉयलेटची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. आज या टॉयलेटचं उद्घाटन झालं. जिंदाल ग्रुपनं सीएसआरच्या माध्यमातून समाटेकच्या सहाय्यानं हे टॉयलेट उभारलं. या टॉयलेटच्या देखभालीचं काम मुंबई महानगरपालिकेकडे असेल. मुंबई महापालिका पुढील दोन महिने टॉयलेटच्या वापरासाठी शुल्क आकारणी करणार नाही. त्यानंतर महापालिकेकडून शुल्क आकारणी करण्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल सौरउर्जेवर चालणारं हे टॉयलेट अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुंबई महापालिका साधारणत: एका टॉयलेटच्या उभारणीसाठी 25 ते 30 लाख रुपये खर्च करते. त्यामुळे मरीन ड्राईव्हमधील टॉयलेट शहरातील सर्वात महागडं टॉयलेट ठरलं आहे. टॅग्स :मुंबईMumbai