युवकांचा झाडे खिळेमुक्त करण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 15:45 IST2018-04-16T15:45:14+5:302018-04-16T15:45:14+5:30

आंघोळीच्या गोळी या उपक्रमाच्या माध्यमाने तरुणांच्या एका टीमनं झाडांवरील खिळे काढण्याचा स्तुत्य उपक्रम 1 एप्रिलला दादर परिसरात शिवाजी पार्क परिसरात सुरू केला.
झाडांच्या वेदना कमी करण्याचा आमचा अट्टहास आहे, असे सांगत खिळेमुक्त झाडांच्या संकल्पनेचा उदय पुण्यात सर्वात प्रथम झाला आणि त्यातून प्रेरित होऊन मुंबई टीमने हा उपक्रम पहिल्यांदा दादर येथे राबवला.
याच टीमनं कल्याण शहरांतील बिर्ला महाविद्यालय ते खडकपाडा सर्कल यादरम्यान असलेल्या झाडांवरील खिळे काढण्याचा उपक्रम राबवला.
केवळ राज्यापुरता मर्यादित हा उपक्रम नसून मुंबईतील विविध भागात तरुणांनी व नागरिकांनी एकत्रित येऊन अशा प्रकारचे उपक्रम राबवावे असे आवाहन आंघोळीची गोळी टीमने केले.
पुण्यातील माधव पाटील या तरूणाने सुरु केलेली खिळेमुक्त झाडे मोहीम ठाणे आणि मुंबई परिसरात विस्तारण्यासाठी आंघोळीची गोळी टीम मुंबई प्रयत्न करत आहे.पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत या युवकांना मिळत आहे.
साधारण ३० युवकांच्या या टीमने दोन तासांत ६० पेक्षा अधिक झाडे खिळेमुक्त केली.