Naming of Lonar as Ramsar Watershed, said Aditya Thackeray with joy
लोणार सरोवर बनलंय 'रामसर पाणस्थळ क्षेत्र', आदित्य ठाकरेंना अत्यानंद By महेश गलांडे | Published: November 13, 2020 05:11 PM2020-11-13T17:11:23+5:302020-11-13T17:21:20+5:30Join usJoin usNext बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराला ‘रामसर’ पाणथळ स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. जगातील जैवविविधतेने महत्त्वपूर्ण असलेल्या पाणथळ जागांना आंतरराष्ट्रीय ‘रामसर’ स्थळाचा दर्जा देण्यात येतो. लोणार अभयारण्य हे महाराष्टातून घोषित झालेले दुसरे ‘रामसर’ स्थळ आहे. ईराणमधील रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी पाणथळ संवर्धन करण्याबाबतचा ठराव झाला होता. १९७५ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. भारताने १९८२ पासून पाणथळ स्थळांचे संवर्धन स्वीकारले आहे. आतापर्यंत जगात २२०० पाणथळ स्थळ असल्याची नोंद आहे. ‘रामसर’ संकेस्थळावर ११ नाेव्हेंबर २०२० रोजी घोषित करण्यात आलेल्या पाणथळ स्थळाच्या यादीत भारतातील दोन स्थळांचा समावेश आहे. यात उत्तर प्रदेशातील आग्रा येथील केथमलेक सरोवर आणि महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचा समावेश आहे. हल्ली लोणार खाऱ्या पाण्याचे तळे हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असून, त्याचे नियंत्रण त्यांच्याचकडे आहे. लोणार सरोवराला ‘रामसर’ पाणथळ स्थळ घोषित झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वनमंत्री संजय राठोड यांनी ट्विट करून वनखात्याचे कौतुक केले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लोणार सरोवरचे छायाचित्र शेअर केले आहे. तसेच, लोणार सरोवर आता रामसर सरोवर झाल्याची माहितीही आदित्य यांनी दिली. मी २००४ मध्ये हे सरोवर पहिल्यांदा पाहिले होते, सर्वांना आकर्षित करेल असे ते दृश्य होते. जैवविविधता, पर्यटनाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व आहे, असेही आदित्य यांनी म्हटलं आहे. आदित्य यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमवेत या सरोवराची पाहणी केली होती, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हेलिकॉप्टरमधून लोणार सरोवराचे छायाचित्र घेतले होते, ते छायाचित्रही आदित्य यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहे. लोणार अभयारण्य हे ८ जून २००० साली निर्माण करण्यात आले. ३६५.१६ हेक्टर परिसरात एवढे क्षेत्र असून, ७७.६९ हेक्टर परिसरात खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे सरोवर जागतिक कीर्तीचे ठरले आहे. ‘रासमर’ पाणथळ स्थळ घोषित झाल्यामुळे जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय करार होण्याची दाट शक्यता आहे.टॅग्स :उद्धव ठाकरेआदित्य ठाकरेलोणारअमरावतीबुलडाणाUddhav ThackerayAditya ThackreyLonarAmravatibuldhana