National Museum of Indian Cinema (NMIC) in Mumbai
...अन् उलगडले चित्रपटसृष्टीचे विश्व By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:58 PM2019-02-04T15:58:45+5:302019-02-04T16:08:24+5:30Join usJoin usNext मुंबई : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच दिमाखात उद्घाटन झाले. या संग्रहालयाच्या निमित्ताने सिनेविश्वात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. जर्मनीतील चित्रपट संग्रहालय जगात प्रसिद्ध आहे. त्याच धर्तीवर भारतातही सुरू करावे, अशी योजना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चार वर्षांपूर्वी आखली होती. त्यासाठी दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. श्याम बेनेगल आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे काम करण्यात आले आहे. कोलकात्याच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालयावर याची जबाबदारी सोपवण्यात आली आणि मुंबईतील फिल्म डिव्हिजनच्या आवारातील गुलशन महाल इमारतीची यासाठी निवड करण्यात आली. मुंबईतील पेडर रोड परिसरात हे भव्य राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय उभारण्यात आले आहे. 50 हजार चौरस फूट जागेवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा पहिला टप्पा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गुलशन महालमध्ये तयार केला आहे. या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातून भारतीय चित्रपटांचा शंभर वर्षांचा इतिहास उलगडला जाणार आहे. हे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय उभारण्यासाठी 141 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या संग्रहालयात भारतीय चित्रपटाशी संबंधित दृश्यं, शिल्प, ग्राफिक्स, भारतीय चित्रपटाविषयी किस्से आणि कथा यांचे सादरीकरण यांचा संग्रह आहे. लुमियर ब्रदर्स, राजा हरिश्चंद्रापासून भारतीय चित्रपटसृष्टीने कसा आकार घेतला, याबाबत माहिती देण्यात आली आहे. (सर्व फोटो - दत्ता खेडेकर)टॅग्स :मुंबईबॉलिवूडMumbaibollywood