मुंबईत येण्यासाठी फक्त सिद्धिविनायकाच्या परवानगीची गरज; कंगनाचा शिवसेनेला टोला By मोरेश्वर येरम | Published: December 29, 2020 02:08 PM 2020-12-29T14:08:15+5:30 2020-12-29T14:32:17+5:30
अभिनेत्री कंगना राणौत मुंबईत आली आहे. तिनं मंगळवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. कंगना यावेळी मराठमोळ्या वेशभूषेत पाहायला मिळाली. अभिनेत्री कंगना राणौत मुंबईत आली आहे. तिनं मंगळवारी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. कंगना यावेळी मराठमोळ्या वेशभूषेत पाहायला मिळाली.
कंगनाने मंगळवारी सकाळी १० वाजता सिद्धिविनायक मंदिरात येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी दिली.
कंगनाने हिरव्या रंगाची पैठणी साडी परिधान केली होती. पारंपारिक साडी कंगनानं मॉर्डन पद्धतीनं नेसली होती.
सिद्धिविनायक मंदिराला भेट दिल्यानंतर कंगानाने प्रसार माध्यमांशीही संवाद साधला.
कंगनाने मंदिरातून बाहेर आल्यानंतर 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष केला. त्यानंतर अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोलाही लगावला.
"मुंबईत येण्यासाठी मला फक्त सिद्धिविनायकाच्या परवानगीची गरज आहे. इतर कुणाच्या परवानगीची आवश्यकता नाही", असं कंगना म्हणाली.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर कंगनाविरोधात मोठा वाद निर्माण झाला होता.
कंगनाच्या या विधानानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी तिच्यावर टीका केली होती. कंगना आणि मुंबई महानगरपालिकेतील वादही यानंतर गाजला.