pedestrian bridge collapsed at the Andheri station western railway disrupted
अंधेरी स्टेशनवर पादचारी पुलाचा भाग कोसळला By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 09:51 AM2018-07-03T09:51:58+5:302018-07-03T10:24:51+5:30Join usJoin usNext अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यानचा पादचारी पूल कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील पुलाचा काही भाग कोसळला. पुलाचा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची सेवा ठप्प झाली आहे. रेल्वे सेवा ठप्प झाल्यानं ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून कोसळलेल्या पुलाचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. पश्चिम रेल्वेसोबतच हार्बर रेल्वेच्या वाहतुकीलादेखील फटका बसला आहे. अंधेरी रेल्वे स्थानकाच्या जवळ असणारा गोखले पादचारी पूल हा 60 वर्ष जुना होता. हा पूल कोसळल्यानं 2 जण जखमी झाले आहेत.टॅग्स :अंधेरी पूल दुर्घटनामुंबईपश्चिम रेल्वेपाऊसAndheri Bridge CollapsedMumbaiwestern railwayRain