Photos: राज ठाकरेंच्या 'नास्तिक' टिकेनंतर पवारांचे मंदिरातील फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:48 AM 2022-04-13T11:48:23+5:30 2022-04-13T12:07:54+5:30
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे फोटो शेअर करत राज्यातील अनेक मंदिरांना शरद पवारांनीच निधी मिळवून दिल्याचं म्हटलंय. तसेच, काही मंदिरांचा जिर्णोद्धारही त्यांच्याच कार्यकाळात झाल्याचे सांगितले. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ठाण्यातील उत्तर सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोफ डागली. विशेष म्हणजे शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला, भूमिका बदलण्याबद्दल त्यांनी बोलावं, असे म्हणत त्यांचा इतिहास सांगितला.
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आपल्या भाषणात नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्याचे सांगत असतात. ते कुणीही नाकारू शकत नाही.
परंतु, शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना दिसत नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या आधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे.
शरद पवार नास्तिक, देव मानत नाहीत, देवळात हात जोडतानाचा फोटो सापडणार नाही, या शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता.
राज यांनी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊतांवरही जबरी प्रहार केला. त्यानंतर, राष्ट्रवादी समर्थकांनीही राज यांच्यावर सोशल मीडियातून टिका केली आहे.
शरद पवार यांच्यावरील टिकेला उत्तर देताना, अनेक राष्ट्रवादी समर्थकांनी शरद पवार यांचे मंदिरातील फोटो शेअर केले आहेत. हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, श्री गणपतींसमोर शरद पवार हात जोडून उभे आहेत.
राष्ट्रवादी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतिश चव्हाण यांनीही शरद पवारांचे मंदिरातील फोटो शेअर केले आहेत. देवाच्या आशीर्वादाने सुर्योदयापासून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शरद पवार सक्षम आहेत, असे कॅप्शनही त्यांनी लिहिलंय.
राष्ट्रवादी समर्थकांनी सोशल मीडियातून अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर हात जोडलेलाही फोटो दिसून येत आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे हे फोटो शेअर करत राज्यातील अनेक मंदिरांना शरद पवारांनीच निधी मिळवून दिल्याचं म्हटलंय. तसेच, काही मंदिरांचा जिर्णोद्धारही त्यांच्याच कार्यकाळात झाल्याचे सांगितले.
राज ठाकरेंनी शरद पवारांसह अनेक राजकीय नेत्यांवर जबरी टीका केली आहे. त्यामुळे, राज यांच्या टिकेला आता शरद पवार प्रत्युत्तर देतील का, हेच पाहायचे आहे.