place in the sea of Mahim shown by Raj Thackeray see what is going on in pics
राज ठाकरेंनी दाखवलेली माहिमच्या समुद्रातील हिच 'ती' जागा, नेमकं काय सुरूय पाहा PHOTOS By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 11:22 PM2023-03-22T23:22:23+5:302023-03-22T23:35:50+5:30Join usJoin usNext मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात विरोधीपक्षासह सत्ताधाऱ्यांनाही लक्ष्य केलं. यावेळी राज ठाकरेंनी एक व्हिडिओ सर्वांना दाखवत सरकारकडून कशापद्धतीनं राज्यात काय चाललंय याकडे दुर्लक्ष असल्याचं दाखवून दिलं. राज ठाकरेंनी यावेळी मुंबईतील माहिमच्या समुद्रात सुरू असलेल्या अनधिकृत वास्तूचा व्हिडिओ दाखवला. हे व्हिडिओ फुटेज ड्रोनच्या माध्यमातून शूट करुन घेतल्याचं राज यांनी यावेळी सांगितलं. "एकेदिवशी सहज माहिमच्या समुद्र किनाऱ्यावर काही माणसं पाण्यातून चालताना दिसली. मग मी एकदा तिथं नेमकं काय आहे हे एकाला पाहायला सांगितलं. मग माझ्याकडे या संपूर्ण परिसराचं ड्रोन फुटेज आलं आणि त्यात जे दिसतंय त्यातून प्रशासनाचं किती दुर्लक्ष आहे हे लक्षात येतं", असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी व्हिडिओ फुटेजमध्ये दाखवलेली ती जागा माहिमच्या समुद्र किनाऱ्या लगतची आहे. भरतीच्या वेळी ती अशी पाण्याखाली जाते. सदर ठिकाणी लावण्यात आलेला एक झेंडा यात पाहयला मिळतोय. ओहोटीच्या वेळी जागेचं संपूर्ण रुप इथं पाहायला मिळतं. याठिकाणी एक कबर बनवण्यात आलेली असल्याचंही दिसून येतं. कबरीच्या शेजारीच दोन झेंडेही फडकवण्यात आले आहेत. तसंच कबरीला हार-फुलांनी सजवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. आता ही कबर नेमकी कुणाची? आणि ती अशी समुद्रात का बांधली गेली? परवानगी कुणी दिली? याची काहीच माहिती अद्याप कळू शकलेली नाही.पण या कबरीचं दर्शन घेण्यासाठी अनेक जण तिथं येत असतानाचंही व्हिडिओमध्ये दिसून आलं आहे. हळूहळू याठिकाणी हाजीअली सारखा दर्गा उभारला जाईल अशी भीती राज ठाकरेंनी व्यक्त केलीय. तसंच हे बांधकाम दोन वर्षात झालं असल्याचाही दावा केला आहे. काही माणशं या कबरीच्या दिशेनं पाण्यातून वाट काढत चालत येतानाही पाहायला मिळतात. हिच ती माहिमची किनारपट्टी जिथून जवळच एक दर्गा आहे आणि माहिम पोलीस ठाणे देखील आहे. टॅग्स :राज ठाकरेमनसेRaj ThackerayMNS