'पद्मावत' सिनेमाच्या प्रदर्शनावरील बंदीसाठी देशभरात निदर्शनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 14:57 IST2018-01-23T14:49:17+5:302018-01-23T14:57:32+5:30

गांधीनगर : करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पद्मावत सिनेमाविरोधात हिंसक आंदोलन केले. यावेळी सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड-जाळपोळदेखील करण्यात आली होती.
संजय लीला भन्साळी यांनी सिनेमामध्ये इतिहासासोबत छेडछाड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. जयपूरमध्येही राजपूत संघटनेनं निदर्शनं केली.
मथुरा : राजपूत संघटनेनं सिनेमागृहाबाहेर 'पद्मावत' सिनेमाविरोधात केली निदर्शनं
मुंबईमध्ये अखंड राष्ट्रवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पद्मावत सिनेमाविरोधात शनिवारी (20 जानेवारी) आझाद मैदानात निदर्शनं नोंदवली
नोएडामध्ये पद्मावत सिनेमाविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले.