मुंबई व उपनगरांना जोडणा-या माटुंगा व सायन भागामध्ये सततच्या पावसाने वाहतुकीची अशी दैना केली.कार्यालयांनी एरवी गजबजणा-या वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये शुक्रवारी सकाळी असे दृष्य होते.पावसाने झोडपलेल्या मुंबईनजीकचा समुद्रही शुक्रवारी बेभान झाला आणि वरळी सागरी पुलाखाली असा लाटांचा थयथयाट झाला.परिस्थितीचा आढावा घेताना मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता.अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा अन्यथा घरातच थांबा अशा सूचना सरकारी अधिका-यांनी मुंबईकरांना दिल्या.मुंबई शहरात व उपनगरात ठिकठिकाणी असं पाणी साचलं व वाहतुकीची कोंडी झाली.मुंबईतल्या मुसळधार पावसाने तिन्ही उपनगरीय रेल्वे वाहतुकीची दाणादाण उडवली. चुनाभट्टी स्थानकातलं हे दृष्य.रात्रभर पडलेल्या पावसाने मुंबईचं जनजीवन शुक्रवार ( १९ जून) सकाळपासून ठप्प केलं. मुंबईची उपनगरीय रेल्वे बंद पडली असूनही डोंबिवली स्थानकावर गाडी येईल अशी आशा बाळगून असलेले प्रवासी.