मुंबईत पावसाची दणक्यात एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:30 IST2018-06-02T22:30:38+5:302018-06-02T22:30:38+5:30

वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने मुंबई उपनगर आणि ठाणे पट्ट्यात हजेरी लावली. (छाया- स्वप्नील साखरे)
आज सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण होते. संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याचे वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.
आज सकाळपासून कोकण, नाशिक आणि महाबळेश्वरमध्ये टप्प्याटप्प्याने पावसाला सुरूवात झाली. यापैकी महाबळेश्वरमध्ये सध्या तुफान पाऊस कोसळत असून वेण्णा लेकला पूर आला आहे. गेल्या दोन तासांपासून याठिकाणी खंड न पडता मुसळधार पाऊस सुरू आहे.
ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड या भागांसह रायगड जिल्ह्यालाही पावसाने चिंब केले.
उकाड्याने हैराण झालेल्या लोकांनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद लुटला.
कोकणातील अनेक भागांमध्ये दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे येथील वातावरण आल्हाददायक झाले होते.
या तुलनेत नाशिक आणि कोकणातील पावसाचे आगमन नागरिकांसाठी सुखदायक ठरले. याठिकाणी सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. त्यामुळे सध्या येथील नागरिक आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेत आहेत.
पावसाच्या सरीच्या शिडकाव्यांमुळे मातीचा सुगंध वातावरणात दरवळला.