रन मुंबई रन

By admin | Published: January 18, 2015 12:00 AM2015-01-18T00:00:00+5:302015-01-18T00:00:00+5:30

पूर्ण मॅरेथॉनमध्ये (भारतीय गट - महिला) जैशा ओ.पीने पहिला ललिता बाबरने दुसरा आणि सुधा सिंगने तिसरा क्रमांक पटकावला.

पूर्ण मॅरेथॉनमध्ये (भारतीय गट - पुरुष) करण सिंगने पहिला अर्जून प्रधानने दुसरा आणि बहादूरसिंग धोनीने तिसरा क्रमांक पटकावला.

पूर्ण मॅरेथॉनमध्ये महिला गटात इथिओपियाच्या दिनकेश मेकाशने २ तास ३० मिनीटांमध्ये अंतर गाठून बाजी मारली. इथिओपियाच्या कुमेशी सिचाला आणि मार्टा मेगाराने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात अव्वल १० पैकी ७ स्थानांवर इथिओपियाच्या धावपटूंचा समावेश होता.

पूर्ण मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात इथिओपियाच्या तेजफाए अबेराने ४२ किलोमीटरचे अंतर २ तास १० मि. ३१ सेकंदांमध्ये पूर्ण करत पहिला क्रमांक पटकावला. तर इथिओपियाच्या देरेजे देबेले दुसरा क्रमांक व केनियाच्या ल्यूक किबेटने तिसरा क्रमांक पटकावला. या वर्षी इथिओपियाच्या धावपटूंनी केनियन धावपटूंचे वर्चस्व मोडून काढले.

हाफ मॅरेथॉनमध्ये (२१ किलोमीटर) पुरुषांमध्ये इंद्रजीत पटेल पहिला आटवा भगत दुसरा आणि गोविंद सिंग तिसरा क्रमांकावर बाजी मारली.

हाफ मॅरेथॉनमध्ये महिला गटात सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणा-या कविता राऊतने अव्वल क्रमांक पटकावला. तर इव्ह ब्लगर आणि सुप्रिया पाटीलने अनुक्रमे दुस-या आणि तिस-या स्थानावर बाजी मारली.

मॅरेथॉन सुरु होण्यापूर्वी प्रार्थना करताना धावपटू

स्वच्छ भारत असा संदेश देत समाजसेवी संस्थाचे कार्यकर्ते या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.

महिलांवरील अत्याचार थांबणार कधी असा सवाल उपस्थित करणारी तरुणी

रिलायन्सचे अनिल अंबानीही मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.

ऐरवी अर्थकारणामध्ये रमणारे रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनीही मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत धावपटू म्हणूनही ते फिट असल्याचे दाखवून दिले.

अभिनेत्री कल्की कोचलिनने अपंग धावपटूसोबत स्पर्धेत सहभाग घेतला.

मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री गूल पनाग.

अभिनेत्री दिया मिर्झा तारा शर्मा अभिनेता राहूल बॉस यांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. तर अभिनेता जॉन अब्राहीम आणि गुलशन ग्रोव्हर स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी आवर्जून उपस्थित होता.

स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भूजबळ आदी नेतेमंडळी उपस्थित होती.

गुलाबी थंडीत सकाळी सहाच्या सुमारास मॅरेथॉनला सुरुवात झाली. मॅरेथॉनिमित्त शहरात सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त होता.

दररोज घडाळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई आज रविवारी सुट्टी असतानाही धावली. निमित्त होते बाराव्या मुंबई मॅरेथॉनचे. गुलाबी थंडीतही सुमारे ४० हजार धावपटूंचा सहभाग सेलिब्रीटी आणि राजकारण्यांची हजेरी अशा उत्साहवर्धक वातावरणात ही मॅरेथॉन पार पडली. या मॅरेथॉनची क्षणचित्रे...