"या" युक्त्या करून वाचवा मेडिक्लेमचा प्रीमियम By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 02:17 PM 2023-07-18T14:17:42+5:30 2023-07-18T14:26:38+5:30
गेल्या काही वर्षांपासून मेडिक्लेम अर्थात आराेग्य विम्याचा प्रीमियम सातत्याने वाढत आहे. उपचारांवरील खर्च वाढल्यामुळे प्रीमियम वाढविणे अपरिहार्य असल्याचे कंपन्या म्हणतात. अशावेळी विम्याचे नूतनीकरण करताना जास्त प्रीमियम द्यावा लागू नये, यासाठी काही गाेष्टींची काळजी घेतल्यास पैसे वाचू शकतात. गेल्या काही वर्षांपासून मेडिक्लेम अर्थात आराेग्य विम्याचा प्रीमियम सातत्याने वाढत आहे. उपचारांवरील खर्च वाढल्यामुळे प्रीमियम वाढविणे अपरिहार्य असल्याचे कंपन्या म्हणतात.
अशावेळी विम्याचे नूतनीकरण करताना जास्त प्रीमियम द्यावा लागू नये, यासाठी काही गाेष्टींची काळजी घेतल्यास पैसे वाचू शकतात.किरकोळ उपचारासाठी दावा करू नका कंपन्या नो क्लेम बोनस देतात. किरकोळ उपचारासाठी विम्याचा लाभ घेतल्यास बहुतांश कंपन्यांमध्ये नो क्लेम बोनसचा फायदा मिळत नाही. तसेच प्रीमियम वाढतो.
किरकोळ उपचारासाठी दावा करू नका कंपन्या नो क्लेम बोनस देतात. किरकोळ उपचारासाठी विम्याचा लाभ घेतल्यास बहुतांश कंपन्यांमध्ये नो क्लेम बोनसचा फायदा मिळत नाही. तसेच प्रीमियम वाढतो.
सुपर टॉपअप विकत घ्या मूळ कव्हरेजवर सुपर टाॅपअप याेजना विकत घेणे लाभदायी ठरते. दहा लाख रूपये विम्याची रक्कम असल्यास ५० ते ९० लाखांपर्यंत सुपर टाॅपअप घेतल्यास सुमारे ६० टक्क्यांपर्यंत फायदा होतो.
रिस्टोरेशनचा पर्याय अनेक कंपन्या आजकाल रिस्टोरेशनचा पर्याय देतात. म्हणजेच, विम्याची मूळ रक्कम वापरली किंवा काही भाग वापरल्यास, ती रक्कम रिस्टाेर म्हणजे पुनर्स्थापित करता येते.
पोर्ट करण्याचा मार्ग विद्यमान कंपनी पुरेसे लाभ देत नसल्यास विमा दुसऱ्या कंपनीत पाेर्ट करता येताे. मात्र, त्या कंपनीने नुकताच प्रीमियम वाढविलेला असल्याचे सुनिश्चित करून घ्या. म्हणजे, १-२ वर्षे वाढीव प्रीमियम देण्याची गरज भासणार नाही.