Shiv Sena has only 5 ministers left; Who is involved with Aditya Thackeray, see the name!
मुख्यमंत्र्यांकडे शिवसेनेचे उरले फक्त ५ मंत्री; आदित्य ठाकरेंसह कोणाचा समावेश, पाहा नावं! By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 01:01 PM2022-06-27T13:01:59+5:302022-06-27T13:33:37+5:30Join usJoin usNext मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह एकूण १५ मंत्रिपदे आहेत. मात्र संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर एक मंत्रिपद रिक्त असल्याने सध्या शिवसेनेकडे १४ मंत्री आहेत. यात शिवसेनेने आपल्या कोट्यातून ३ अपक्ष आमदारांना मंत्रिपद दिले होते. मात्र, आता शिवसेनेतील बंडानंतर यातील तब्बल ९ मंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात समील झाले आहेत. १. उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय, खाती (विधान परिषद सदस्य)२. आदित्य ठाकरे पर्यटन, पर्यावरण, राज्यशिष्टाचार, विधानसभा सदस्य मतदारसंघ: वरळी, मुंबई३. शंकरराव गडाख मृदा व जलसंधारण, शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री, विधानसभा सदस्य मतदारसंघ: नेवासा, जि. अहमदनगर४. सुभाष देसाई उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा विधान परिषद सदस्य५. अनिल परब परिवहन, संसदीय कामकाज विधान परिषद सदस्यटॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेनाEknath ShindeUddhav ThackerayShiv Sena