सोनम कपूरने शाळकरी मुलींना वाटले 'सॅनिटरी नॅपकिन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 16:12 IST2018-01-23T16:08:45+5:302018-01-23T16:12:52+5:30

सोनम कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट 'पॅडमॅन'चं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे

चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून सोनम कपूरने कुर्लामधील एका शाळेत मुलींना सॅनिटरी नॅपकीन वाटले

यावेळी सोनम कपूरसोबत चित्रपटाचे दिग्दर्शक आर बल्कीदेखील उपस्थित होते

'पॅडमॅन' चित्रपटात सोनम कपूरसोबत अक्षय कुमार आणि राधिका आपटे मुख्य भुमिकेत आहे

'पॅडमॅन' सिनेमामध्ये ग्रामीण भागातील महिलांना मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणा-या पॅडसंदर्भात जनजागृती करण्याचा संदेश यात देण्यात आला आहे