डॉ. बाबासाहेब अन् ठाकरे कुटुंबीयांचा विशेष ऋणानुबंध, राज ठाकरेंनी सांगितली आठवण By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 05:23 PM 2021-04-14T17:23:25+5:30 2021-04-14T17:32:10+5:30
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जगभरात घराघरात साजरी केली जात आहे. कोरोना व्हायरसमुळे भलेही बाहेर कार्यक्रम करता आले नसतील. पण घरात लोक शांततेत जयंती साजरी करत आहेत. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जगभरात घराघरात साजरी केली जात आहे.
कोरोना व्हायरसमुळे भलेही बाहेर कार्यक्रम करता आले नसतील. पण घरात लोक शांततेत जयंती साजरी करत आहेत.
डॉ. बाबासाहेबांबद्दलच्या काही खास गोष्टी, आठवणी आणि लेख सोसल मीडियातून शेअर केले जात आहेत. तसेच, सोशल मीडियातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब यांच्या कार्याची महती सांगत त्यांना विनम्र अभिवादन केलंय
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे. त्यावेळी, ठाकरे कुटुंबीयांशी त्यांची असलेली जवळीकही व्यक्त केली.
राज यांनी फोटो शेअर करत, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला बाबासाहेबांनी निर्वावाद पाठिंबा दर्शवल्याचं सांगितलं.
आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या आवाहनाबद्दल बाबासाहेबांची भूमिका सकारात्मक होती.
माझे वडिल श्रीकांत ठाकरे यांनीही बाबासाहेबांच्या प्रकाशनांसाठी काही व्यंगचित्रे रेखाटली होती, अशी आठवण राज यांनी सांगितली.
ठाकरे कुटुंबीयांचा डॉ. बाबासाहेब यांच्याशी असलेल्या ऋणानुबंध माझ्यासाठी निश्चित प्रेरणादायी आहे, असे राज यांनी म्हटलंय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासुर्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असे म्हणत राज यांनी बाबासाहेबांना जयंतीदिनी आदरांजली वाहिली आहे.
डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतीदिनी आज सोशल मीडियावर जयभीम आणि भीमजयंती हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत