दुर्गाविसर्जनाच्या दिवशी होणारा खास कार्यक्रम 'सिंदूर खेला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 18:25 IST2017-09-30T18:23:18+5:302017-09-30T18:25:26+5:30

दुर्गाविसर्जनाच्या दिवशी चुकवू नये असा कार्यक्रम म्हणजे ‘सिंदूर खेला’. देशभरात विवाहीत बंगाली महिला हा उत्सव साजरा करतात. आज ठाण्यात हा उत्सव पार पडला.

काठाची पांढरी साडी नेसलेल्या बायका एकमेकींना कुंकू लावतात. होळीत जसा रंग खेळला जातो, तसं कुंकवानं एकमेकींना रंगवलं जातं.

नवरात्रींमध्ये एका वेगळ्याच चैतन्याचा आविष्कार पहायला मिळतो. त्यामध्ये 'सिंदूर खेला' या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.

सिंदुर खेल्याची झलक टिपण्यासाठी फोटोग्राफर उत्सुक असतात. या सोहळ्यात चैतन्याच्या आविष्कारा पाहायला मिळतो.