SRA ने केली कमाल! झोपडीत राहणाऱ्यांना दिलं हक्काचं घर अन् आत्मविश्वास By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2024 10:18 AM 2024-10-15T10:18:40+5:30 2024-10-15T10:31:30+5:30
झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एसआरए ने वेगाने पावले उचलली. मुंबईतील विविध भागांत आधी काय स्थिती होती आणि पुनर्विकासानंतर किती सुंदर इमारती उभा राहिल्या. त्याचाच हा प्रवास... झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबई विभागाने मुंबईतील अनेक झोपड्यांचे पुनर्वसन केले. झोपडीधारकांना केवळ पक्के घर दिले नाही तर त्यांना एक विश्वासही दिला.
झोपडीत राहणाऱ्यांना चांगले घर मिळाल्यामुळे त्यांच्या राहणीमानात आणि आत्मविश्वासात फरक पडला. पुनर्वसनाच्या आधी ज्या जागेवर झोपड्या होत्या ती स्थिती कशी होती आणि त्या ठिकाणी चांगले टॉवर उभे केल्यानंतर नेमके काय झाले ते या छायाचित्रांमधून लक्षात येईल.
झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एसआरए ने वेगाने पावले उचलली. मुंबईतील विविध भागांत आधी काय स्थिती होती आणि पुनर्विकासानंतर किती सुंदर इमारती उभा राहिल्या. त्याचाच हा प्रवास...
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हा महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या अंतर्गत एक घटक असून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत विविध शासकीय, निम्नशासकीय, खाजगी जमिनीवर असलेल्या संरक्षित झोपडपट्टीमधील झोपडीधारकांचे राहणीमान उंचावणे पात्र झोपडीधारकांना पक्की घरे देण्याबाबतचे नियोजन व अंमलबजावणी केली जाते.
वरळी- शिवडी जोड रस्ता (850 सदनिका) बांद्रा कुर्ला समुह ते सांताक्रुज चेंबुर लिंक रोड दरम्यानचा जोडरस्ता (4 सदनिका) माहिम किल्लाचे सौंदयीकरण (175 सदनिका) मराठी भाषा भवन (5 सदनिका) एमएमआरडीए अंतर्गत येणा-या विविध नागरी प्रकल्पांकरिता (22,484 सदनिका) पोर्डसर नदी रुंढिकरण (162 सदनिका) विविध रस्ता रुदिकरण व नाला रुंदिकरण प्रकल्प तसेच तानसा पाईपलाइन (22,949 सदनिका) रसराज नाला रुंदीकरण (38) अशा एकूण आजमिती अखेर एकूण 46,667 सदनिका विविध नागरी प्रकल्पांकरीता प्राधिकरणामार्फत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
प्राधिकरणामार्फत सन 2014 पुर्वी दाखल करण्यात आलेल्या तथापी रखडलेल्या एकूण 517 योजना रह करून सदरच्या योजना नव्याने मार्गी लावणेकरिता नियमावली निश्चित करण्यात आली आहे.
झोपडपट्टी योजना मार्गी लागण्याकरिता लागणारा अतिरिक्त 3 महिन्यांचा कालावधी कमी करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी येत्या तीन वर्षांत झोपडीवासीयांना दोन लाख घरे उपलब्ध करू देण्याचा संकल्प सोडला आहे.
हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कंबर कसली असून संकल्पपूर्ततेसाठी सर्व प्राधिकरणांच्या सहकार्याने शिवधनुष्य पेलण्याचे ठरविले आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत शासन निर्णयानुसार व विकास नियोजन व प्रोत्साहन नियमावली तरतूदीनुसार पात्र झोपडीधारकांना 300 चौ. फु. चटई क्षेत्रफळ असलेली सदनिका विविध सुविधा जसे की, बालवाडी, समाजमंदीर, सोसायटी कार्यालय, वाचनालय, कौशल्य विकास केंद्र इत्यादीसह उपलब्ध करुन दिले जाते.
घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीच्या पुनर्विकासाला एमएमआरडीएने प्रत्यक्ष सुरुवात केली आहे.
या योजनेसाठी लागणारा निधी एमएमआरडीए उपलब्ध करून देणार आहे.