sridevi death 54 dubai her personal moments daughters jhanvi khushi
श्रीदेवींचं मुलींसोबत होते मैत्रिणीसारखे नाते By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 03:17 PM2018-02-26T15:17:28+5:302018-02-26T15:17:28+5:30Join usJoin usNext बॉलिवूडमधील पहिल्या महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे शनिवारी (24 फेब्रुवारी) दुबईमध्ये निधन झाले. श्रीदेवी यांचे वयाच्या 54व्या वर्षी कार्डिअॅक अरेस्टने मृत्यू झाला. भाचा मोहित मारवाह याच्या लग्नासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर, मुलगी खुशी व परिवारातील अन्य सदस्यांसोबत दुबईला गेल्या होत्या. लग्नसोहळ्यातील फोटोदेखील त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. श्रीदेवींचे मुलगी जान्हवी आणि खुशीसोबत विशेष असे बॉडिंग होते. श्रीदेवी यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अधिकतर मुलींचेच फोटो पाहायला मिळतील. आपल्या मुलींच्या करिअरवरुन श्रीदेवी नेहमीच चिंतित असायच्या. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी 'धडक' सिनेमाद्वारे इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. तिचा पहिला वहिला सिनेमा पाहण्यासाठी श्रीदेवी प्रचंड उत्सुक होत्या. जान्हवीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं, यासाठी श्रीदेवी यांनी तिला प्रचंड प्रोत्साहन दिले होतं. या मायलेकींमध्ये मैत्रिणीसारखेच नातं होते.टॅग्स :श्रीदेवीकरमणूकबॉलिवूडSridevientertainmentbollywood