ST Corporation's Nathjal scheme, don't buy water at low cost
ST महामंडळाची 'नाथजल' योजना, कमी किंमतीत पाणी घ्या ना By महेश गलांडे | Published: November 2, 2020 09:23 PM2020-11-02T21:23:31+5:302020-11-02T21:31:17+5:30Join usJoin usNext प्रवास म्हटलं की पाण्याची घरातूनच सोय करावी लागते. पण, अलिकडच्या काळात पाणी बॉटल घेण्याचा ट्रेंड वाढला आहे. रेल्वे स्टेशन असो वा, बस स्थानक असो... सगळीकडे प्रवाशांची पाण्यासाठी गर्दी होते, त्यात अनेकदा जादा दराने पाणी बाटल्यांची विक्रीही करण्यात येते एसटीच्या लाखो प्रवाशांना स्वस्त दरात, दर्जेदार शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने ‘नाथजल’ शुद्ध पेयजल योजनेचे उद्घाटन परिवहन मंत्री व एस.टी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या हस्ते आज करण्यात आले. परब म्हणाले, या योजनेअंतर्गत महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर महामंडळाचे अधिकृत बाटली बंद पेयजल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची महान परंपरा लाभली आहे. त्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गुरूला ‘नाथ’ या नावाने संबोधले जाते त्यांच्या आदराप्रित्यर्थ एसटीच्या अधिकृत बाटलीबंद पेयजलास ‘नाथजल’ हे नाव देण्यात आले आहे. टप्याटप्याने राज्यातील सर्व बसस्थानकावर ‘नाथजल’हे एसटी महामंडळाचे अधिकृत पेयजल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरामध्ये दर्जेदार शुद्ध पेयजल एसटी महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही परब यांनी सांगितले. संपूर्ण राज्यात बाटलीबंद पाणी पुरविण्यासाठी मे. शेळके बेव्हरेजेस प्रा.लि. पुणे (Oxycool) या संस्थेची निवड करण्यात आली असून, सर्व बस स्थानकावर ६५० मिलीलिटर व १ लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये हे ‘नाथजल’ विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यांचा दर अनुक्रमे १० रुपये व १५ रुपये इतका असेल, अशी माहिती एस.टी. महामंडळाकडून देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, मे.शेळके बेव्हरजेस प्रा.लि. पुणे (Oxycool) या संस्थेचे अध्यक्ष निलेश शेळके व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बसमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना या योजनेचा फायदा होणार असून जादा दराने विक्री करणाऱ्यांना चाफ बसणार आहेटॅग्स :बसचालकपाणीअनिल परबBus DriverWaterAnil Parab