Sticker support for passenger safety, but only Marathi's 'Aashi Ki Kei'
प्रवासी सुरक्षिततेसाठी स्टिकरचा आधार, मात्र मराठीची 'एैशी की तैशी' By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 10:25 PM2017-11-21T22:25:55+5:302017-11-21T22:34:34+5:30Join usJoin usNext मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली. याच धर्तीवर पश्चिम रेल्वेच्या बहुतांशी रेल्वे स्थानकांच्या पाय-यांवर विविध स्टीकर चिटकवण्यात आले आहेत. मात्र स्टिकरवरील मराठी भाषा पाहता ‘मराठीची एैशी तैशी’ झाल्याचे दिसून येत आहे. पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव आणि सांताक्रुझ स्थानकातील पादचारी पूलांच्या पाय-यांवर ‘कृपया लहान चेंडू घेऊ नका’,‘कृपया एकतर बाजूला ठेवा’, ‘कृपया हँड्राईल धरुन ठेवा’, ‘कृपया एक पाऊल वगळू नका’ असा संदेश देणारे स्टिकर लावण्यात आले आहेत. यामुळे प्रवासी जागरुकतेसाठी चिटकवण्यात आलेले स्टिकर सध्या प्रवासी हास्याचे विषय बनत आहेत. विशेष म्हणजे, इंग्रजी संदेशाचे मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटरचा वापर करण्यात आल्याने हा घोळ झाल्याचे समजते. टॅग्स :मुंबई लोकलएलफिन्स्टन चेंगराचेंगरीMumbai LocalElphinstone Stampede