'समृद्धी महामार्गाची संकल्पना 22 वर्षांपूर्वीची, तेव्हा विलासराव होते मुख्यमंत्री' By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 05:27 PM 2023-01-31T17:27:26+5:30 2023-01-31T18:05:59+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे भूमिपुत्र देवेंद्र फडणवीस यां गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे भूमिपुत्र देवेंद्र फडणवीस यां गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात झालं.
त्यानंतर आता समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या दोन शहरांमधील वाहतूक सुरूही करण्यात आली असून महाराष्ट्राच्या विकासात समृद्धी महामार्ग हा महत्त्वाचं योगदान देत आहे.
समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केल्यानंतर पीएम नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. तसेच, ज्या गतीने हे काम पूर्ण झालं, त्याचंही योगदान सांगितलं.
नागपूरचे सुपुत्र असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी समृद्धी महामार्गाची संकल्पना २००० सालीच मांडली होती. त्यानंतर, तब्बल २२ वर्षांनी हा महामार्ग सत्यात उतरला असून आता प्रवाशांची वाहतूकही झाली आहे.
विदर्भाचा विकास झाला पाहिजे, यामागे कनेक्टीव्हीटी महत्त्वाची आहे. त्यासाठीच, नागपूर ते मुंबई एक्स्प्रेस वे असला पाहिजे अशी संकल्पना मी सन 2000 च्या विधानसभेत मांडली होती.
त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. ते म्हणाले, सध्या एक रोड तयार करत आहोत, भविष्यात याचा विचार करूया, अशी आठवण फडणवीसांनी या महामार्गाच्या संकल्पनेबद्दल सांगितली.
मुख्यमंत्री म्हणून मला काम करायची संधी मिळाली, तेव्हा मी हा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग करण्याचा निर्णय घेतला. कारण, हा केवळ रस्ता नाही, तर जेएनपीटी पोर्टची डेव्हलपमेंट जास्तीत जास्त दूरपर्यंत पोहोचवण्यासाठी ही संकल्पना मी मांडली, असे फडणवीसांनी सांगितले.
१० जिल्हे डायरेक्ट आणि १४ जिल्हे इनडायरेक्ट जोडण्याचे काम या महामार्गाच्या माध्यमातून झाले आहे. हा जो रस्ता आहे तो इकॉनॉमिक व्हॅल्यू तयार करण्याचे काम करतो, असेही फडणवीस यांनी म्हटले.
दरम्यान, मुंबई-नागपूर महामार्गाच्या ५२० किमी लांबीच्या या पहिल्या टप्प्यावर उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः कार चालवली होती. त्यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही बाजुच्या सीटवर बसलेले होते.
७१० किमी लांबीचा सुपर द्रुतगती मार्ग नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे मधून जाणार आहे.