Devendra Fadanvis: उपमुख्यमंत्री म्हणाले; "सचिन तेंडुलकरनेही अनेक कर्णधारांच्या नेतृत्वात बॅटींग केलीय" By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 06:53 PM 2022-09-12T18:53:34+5:30 2022-09-12T19:23:13+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन विविध प्रश्नांवर उत्तर दिली. मिशन गुवाहटी, शिवसेना-भाजप यांच्यातील वाद, राजकीय महत्त्वाकांक्षा यांसंदर्भातील प्रश्नांवर त्यांनी मनसोक्त उत्तरे दिली. तसेच, आगामी काळात भाजप-शिवसेना युतीतच निवडणुका लढणार असल्याचंही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच राजकीय सामना सुरू झाला होता. त्यातून महाविकास आघाडीचा जन्म झाला आणि सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले.
शिवसेनेकडून झालेला हा वार भाजपला मोठी जखम देऊन गेला होता. त्यामुळेच, या जखमेचा बदला घेण्यासाठी पलटवार करण्याचंही भाजपने ठरलं होतं. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे मान्य केलं असून आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्याचा हा बदला असल्याचं त्यांनी म्हटलं.देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन विविध प्रश्नांवर उत्तर दिली. मिशन गुवाहटी, शिवसेना-भाजप यांच्यातील वाद, राजकीय महत्त्वाकांक्षा यांसंदर्भातील प्रश्नांवर त्यांनी मनसोक्त उत्तरे दिली. तसेच, आगामी काळात भाजप-शिवसेना युतीतच निवडणुका लढणार असल्याचंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन विविध प्रश्नांवर उत्तर दिली. मिशन गुवाहटी, शिवसेना-भाजप यांच्यातील वाद, राजकीय महत्त्वाकांक्षा यांसंदर्भातील प्रश्नांवर त्यांनी मनसोक्त उत्तरे दिली. तसेच, आगामी काळात भाजप-शिवसेना युतीतच निवडणुका लढणार असल्याचंही ते म्हणाले.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढणार आहे. तसेच, २०२४ मध्येही आम्ही एकत्र निवडणूक लढू, असे फडणवीस यांनी सांगितले. मात्र, महाराष्ट्रात चेहरा कोण असेल या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी खिलाडू वृत्तीने उत्तर दिलं.
एक कॅप्टन चांगला परफॉर्मन्स देत आहे, मग आत्ताच प्रश्न का, असे फडणवीस म्हणाले. तसेच, सचिन तेंडुलकर मिलिनियर्संचा स्टार आहे, त्यांच्यासारखा फलंदाज होणे नाही. पण, त्यांनीही अनेक कर्णधारांच्या नेतृत्वात क्रिकेट खेळलंय. फलंदाजी, गोलंदाजी केली, असे म्हणत राजकारणातील सचिन तेंडुलकर आपण असल्याचं फडणवीसांनी सूचवलं.
एक टीम असते, आम्ही टीम बीजेपीचे कार्यकर्ता आहोत. आम्ही असे ऑलराऊंडर आहोत की, आम्हाला नाईट वॉचमन म्हणून जरी पाठवलं तरी आम्ही शतक ठोकणार, असे म्हणत फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यामागची पक्षनिष्ठा व्यक्त केली.
टीम भाजपला आवश्यकता होती, त्यामुळे आमच्या नेत्यांनी सांगितलं की सरकारमध्ये तुम्ही असायला हवं. त्यानुसार, मी पक्षादेशा मान्य करत सरकारमध्ये सामिल झालो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत हे प्रपोजलच माझं होतं. त्यामुळे, मी मुख्यमंत्री बनणार नाही, हे मला माहिती होतं. पण, मी बाहेर राहून काम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बाहेर राहून सरकार चालत नाही, हे पक्षाने मला सांगितलं.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत हे प्रपोजलच माझं होतं. त्यामुळे, मी मुख्यमंत्री बनणार नाही, हे मला माहिती होतं. पण, मी बाहेर राहून काम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बाहेर राहून सरकार चालत नाही, हे पक्षाने मला सांगितलं.
देवेंद्र फडणवीसांना एका न्यूज चॅनेलमध्ये रॅपिड फायर प्रश्न विचारण्यात आले होते. त्या प्रश्नाला केवळ Yes किंवा No या फलकाद्वारे उत्तर द्यायचं होतं. फडणवीसांनी बिनधास्तपणे या प्रश्नावर उत्तर दिलं. त्यामध्ये, त्यांना पत्नी अमृता फडणवीस, कोरोना काळातील घरकाम आणि राजकीय प्रश्नही विचारण्यात आली.
उद्धव ठाकरेंसोबत वन टू वन एक कप चहा पिणार का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्यावर, फडणवीसांनी आपल्या हातातील फलक Yes असा दर्शवला. फडणवीसांच्या या उत्तरावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.