The Kashmir Files: 'सत्य हे सत्य... प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट पाहिला पाहिजे' By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 04:46 PM 2022-03-23T16:46:28+5:30 2022-03-23T17:17:53+5:30
हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात आहे असं मला वाटत नाही. उलट या देशात खोटं चित्र उभं करणाऱ्यांच्या विरोधात हा चित्रपट आहे. कोणत्याही धर्म, जातीचा असलेल्या प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट पाहिला पाहिजे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या फारच चर्चेत आहेत. काश्मीरी पंडितांवर झालेला अन्याय असा चित्रपटाचा विषय आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केलं.
यात पल्लवी जोशी, अनुपम खेर, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, दर्शन कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात काही राज्यात टॅक्स फ्री केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पल्लवी जोशी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, यांच्यासह द काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहिला. भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी मुंबईत सिनेमा पाहिल्याचं ट्विट करुन सांगितलं.
सत्य हे सत्यच असतं, ज्यांनी ऐतिहासिक सत्य जाणून पुढच्या पिढीला सांगायचं नाही, तेच लोकं या चित्रपटाला विरोध करत आहेत. द काश्मीर फाईल्स हा चित्रपट इतिहासाचं सत्य सांगतो.
या चित्रपटातून जम्मू काश्मीरचं सत्य सांगण्यात आलंय. हा चित्रपट इतिहासातील सत्य आणि तथ्यांवर आधारीत आहे. यातील घटना इतिहासाचं सत्य आहे, असेही फडणवीसांनी म्हटलंय.
“काश्मीर फाईल्स पाहिल्यानंतर मी स्तब्ध आणि निशब्द आहे. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहिला पाहिजे. काश्मीरचं सत्य चित्रपटाच्या निमित्ताने समोर आलं आहे.
हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात आहे असं मला वाटत नाही. उलट या देशात खोटं चित्र उभं करणाऱ्यांच्या विरोधात हा चित्रपट आहे. कोणत्याही धर्म, जातीचा असलेल्या प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट पाहिला पाहिजे.
पंतप्रधानांनी ३७० कलम हटवून देशात कोणती क्रांती आणली हे समजून घ्यायचं असेल काश्मीर फाईल्स पाहिला पाहिजे,” असं फडणवीस चित्रपट पाहिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
विशेष म्हणजे फडणवीसांनी विधानसभेतही डंके की चोट पे.... असं म्हणत हा सिनेमा आम्ही पाहायला गेलो होते, असे म्हटले