There are no air-conditioned sleeper ST ...
विना वातानुकूलित शयनयान एसटी आली रं... By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 09:29 PM2018-07-06T21:29:28+5:302018-07-06T21:32:41+5:30Join usJoin usNext राज्याची जीवनवाहिणी असलेली एसटी सध्या कात टाकत आहे. परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जानेवारी २०१८ रोजी आगामी वर्षात १ हजार विना वातानुकूलित शयनयान महामंडळात दाखल होतील, अशी घोषणा केली होती. या धर्तीवर पहिली प्रोटोटोईप शयनयान एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी तयार आहे पुण्याच्या मध्यवर्ती कार्यशाळेत या बसची बांधणी करण्यात आली. २ बाय१ अशा स्वरुपात ३० आसनांची क्षमता या बस मध्ये आहे. पुण्यातील सीआयआरटी संस्थेने मंजूरी दिल्यानंतर प्रवासी सेवेत या बस चालवण्यात येतील सध्या रातराणीच्या ६०० बस राज्यात धावत आहेत.रातराणीच्या जागेवर नवीन एसटी धावणार आहे सध्या तरी रातराणीचेच तिकिट दर शयनयानसाठी आकारले जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.