Today Superman will be seen in the present day
आज सुपरमूनचं होणार दर्शन By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 02:50 PM2018-01-01T14:50:16+5:302018-01-01T14:56:08+5:30Join usJoin usNext नूतन वर्षारंभी १ जानेवारी रोजी सोमवारी रात्री सर्वांना ‘सुपरमून’चे दर्शन होणार असल्याची माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली. (फोटो- अमोल मचाले) सोमवारी (1 जानेवारी) सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी पौष पौर्णिमा सुरू होईल. चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लक्ष ८४ हजार किलोमीटर दूर असतो. पौर्णिमेला जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला ‘सुपरमून’ म्हणतात. अशा वेळी चंद्रबिंब नेहमीच्या पौर्णिमेपेक्षा चौदा टक्के मोठे व तीस टक्के जास्त प्रकाशित दिसते. सोमवारी चंद्र पृथ्वीपासून तीन लक्ष ५६ हजार किलोमीटर अंतरावर येत आहे. त्यामुळे आपणास सुपरमूनचे दर्शन होणार आहे.टॅग्स :सुपरमूनSupermoon