Unfortunate death of another woman in Chembur tree collapsed
चेंबूरमध्ये झाड कोसळून आणखी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 11:55 PM2017-12-07T23:55:16+5:302017-12-07T23:59:33+5:30Join usJoin usNext चेंबूरमध्ये झाडं अंगावर कोसळून एका महिला प्रवासीचा आज सकाळी दुर्दैवी अंत झाला. चेंबूरमधील ही दुसरी घटना आहे. चेंबूरमध्ये डायमंड गार्डन परिसरातील बस थांब्यावर आज सकाळी ११ च्या सुमारास शारदा सहदेव घोडेस्वार (वय ४५) बसची वाट पाहत होत्या. बराच वेळ बस नसल्याने त्या जवळच असलेल्या झाडाशेजारील बाकावर बसल्या. त्याचवेळी अचानक झाड अंगावर पडून त्या जबर जखमी झाल्या. स्थानिकांनी त्यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पांजरपोळ येथे राहणा-या शारदा चेंबूर येथे घरकाम करीत होत्या. तिथल्याच ड्रिमलँड सोसायटीमध्ये घरकाम आटपून त्या बाहेर पडल्या होत्या. मात्र सोसायटीबाहेरील बस थांब्याजवळील गुलमोहरच्या झाडाने त्यांचा बळी घेतला. याआधी जुलै महिन्यात चेंबूरमधील स्वस्तिक पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या कांचन नाथ या महिलेवर माडाचे झाडं कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे धोकादायक स्थितीत उभी झाडं मुंबईकरांसाठी मृत्युचा सापळा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. टॅग्स :मुंबईMumbai