Unique performance of 'World of Fish' in the dark
‘वर्ल्ड ऑफ फिश’ चे अंधेरीत अनोखे प्रदर्शन By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 01:47 AM2019-06-05T01:47:48+5:302019-06-05T01:49:55+5:30Join usJoin usNext विविध माशांच्या दुर्मिळ अशा जाती-प्रजातीं यांचे ‘वर्ल्ड ऑफ फिश’ हे अनोखे प्रदर्शन अंधेरी (पश्चिम) येथील भवन्स नेचर अँड अॅडव्हेंचर सेंटर, भवन्स कॉलेज कॅम्पस येथे सुरु झाले आहे. (सर्व छायाचित्रे - दत्ता खेडेकर) या प्रदर्शनात आफ्रिका, मलेशिया, बँकॉक, फिलिपाईन्स आणि भारत देशांमधील २००० हूनही अधिक छोटे मोठे मासे आहेत माशांच्या ४०० हूनही अधिक जाती-प्रजाती, १४० हूनही अधिक मत्स्यालयामधील अॅरोवामा, अॅरोप्रीयामा, ब्लॅक घोष्ट, डेव्हील फिश, अॅलीगेटर गार, स्टिंग रे, व्हीमल, मार्स फिश, स्टार फिश आदी जातींचे अनेक मासे पाहण्याची अनोखी संधी मिळणार आहे. भवन्स नेचर अँड अॅडव्हेंचर सेंटर, भवन्स कॉलेज कॅम्पस, अंधेरी (पश्चिम), मुंबई येथे ५ ते ९ जून २०१९ दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या कालावधीत मत्स्यप्रेमींना मिळणार आहे.