इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे मुंबईत मऱ्हाठमोळं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 15:30 IST2018-01-18T14:43:16+5:302018-01-18T15:30:54+5:30

मुंबईतील यहुदी समाजाची भेट घेण्यासह बॉलिवूडला जवळून पाहण्यासाठी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून गुरुवारी (18 जानेवारी) मुंबई दौ-यावर आहेत.
गुजरात दौरा बुधवारी (17 जानेवारी) पूर्ण केल्यानंतर, संध्याकाळी ते मुंबईला पोहोचले.
मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचे मराठमोळ्या पद्धतीत स्वागत करण्यात आले.
नेतान्याहू यांच्या भोजनाची व्यवस्था खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील एक ठिकाण असलेल्या नरिमन हाऊस येथील छाबड सेंटरलाही नेतान्याहू भेट देणार आहेत. सोबत ते 26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत.
छाबड सेंटरमध्ये उभारलेल्या संग्रहालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.