मुंबईची तुंबई! मुसळधार पावसामुळे शहर जलमय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 14:43 IST2019-07-02T14:34:31+5:302019-07-02T14:43:36+5:30

सतत सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील विविध भागांमध्ये पाणी साचलं. त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले.

मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन-तेरा वाजवले. त्यामुळे अनेकांना रेल्वे रुळांवरुन चालत जावं लागलं.

सखल भागात पाणी साचल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

सलग दोन दिवस बरसणाऱ्या पावसानं मुंबई महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली.

गुडघाभर पाणी साचल्यानं अनेक ठिकाणी वाहनं बंद पडण्याचे प्रकार घडले.

मुसळधार पावसानं रेल्वे वाहतुकीसोबतच रस्ते वाहतुकीचाही फज्जा उडवला.

पावसाच्या दमदार बॅटिंगमुळे सर्वसामान्य मुंबईकरांना हालअपेष्टांना सामोरं जावं लागत आहे.