what happened in aarey forest in last 24 hours
काय आहे आरेचा वाद? काय काय घडलं गेल्या 24 तासांत? By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:50 PM2019-10-05T15:50:25+5:302019-10-05T16:01:38+5:30Join usJoin usNext आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीविरोधात अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मानवी साखळीच्या माध्यमातून स्थानिक, पर्यावरणप्रेमी झाडं तोडू नका असं आवाहन करत आहेत. आरेतील वृक्षतोडीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका काल (४ फेब्रुवारीवला) न्यायालयानं फेटाळून लावल्या. त्यानंतर संध्याकाळी झाडं तोडण्याचं काम सुरू झालं. आरेत वृक्षतोड असल्याची माहिती मिळताच स्थानिक, पर्यावरणप्रेमी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वृक्षतोडीस विरोध केला. एका रात्रीत प्रशासनानं आरेमधील जवळपास २०० झाडं कापली. वृक्षतोडीस विरोध करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांनी मोठ्या प्रमाणात धरपकड केली. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरे परिसरातील बंदोबस्त वाढवला. त्यानंतर या भागात कलम १४४ लागू करण्यात आलं. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यानं हा वाद आणखी पेटण्याची चिन्हं आहेत.टॅग्स :आरेमेट्रोAarey ColoneyMetro