खासदारकी गेल्यानंतर पुढील प्लॅन काय?; प्रीतम मुंडेंनी स्पष्टच सांगितलं By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 04:36 PM 2024-03-14T16:36:58+5:30 2024-03-14T16:50:39+5:30
निवडणूक आोयगाच्या घोषणेपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली असून यंदा काही नव्या चेहऱ्यांनाही भाजपाने संधी दिली आहे. निवडणूक आोयगाच्या घोषणेपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली असून यंदा काही नव्या चेहऱ्यांनाही भाजपाने संधी दिली आहे.
भाजापाने गेल्या काही वर्षांपासून राजकीय वनवासात असलेल्या पंकजा मुंडेंना तिकीट दिलं आहे. मात्र, बीडमध्ये मागील दोन टर्मपासून खासदार असेल्या प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
पंकजा मुंडेंनी आज खासदार प्रीतम मुंडेंसह पत्रकार परिषद घेऊन या उमेदवारीचं स्वागत केलं. मात्र, मनात हलकसं दु:ख असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.
प्रीतम मुंडेंनीही पंकजा मुंडेंना मिळालेल्या तिकीटाचं स्वागत केलं असून मला दिल्ली बोट धरुन पाठवणाऱ्याही पंकजा मुंडेच होत्या, असे म्हटलं आहे. माझ्यापेक्षा त्यांचे दिल्लीत अधिक चांगले संबंध असल्याचंही त्या म्हणाल्या.
पंकजाताई या माझ्या नेत्या आहेत, त्यांचं बोट धरुनच मी राजकारणात आले आहे. त्यामुळे, आपल्या नेत्याला काही शिकवावं हे दिवस अद्याप आले नाहीत, असे म्हणत पंकजा मुंडेंच्या उमेदवारीचं प्रीतम यांनीही स्वागत केलं आहे.
पुढील योजना काय, असे विचारले असता आता एकमेव लक्ष्य हे पंकजा मुंडेंसाठी लोकसभा निवडणुकीत उतरुन काम करायचं आहे. त्यामुळे, सध्या दुसरा कुठलाही प्लॅन डोक्यात नसून लोकसभा निवडणुकांसाठी पंकजाताईंच्या सोबत असणार आहे, असे प्रीतम मुंडे यांनी स्पष्ट केले.
प्रीतम मुंडे आणि माझ्यात चांगला समन्वय आहे. प्रीतम मुंडे जास्त दिवस घरी राहणार नाहीत. प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही, असेही पंकजा यांनी यावेळी म्हटले.
लोकसभा उमेदवारी हा मी सन्मान मानते. पण, माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली नाही, याचं हलकं दु:ख माझ्या मनात आहे, जोपर्यंत ती तिच्या त्या जागेवर बसत नाही तोपर्यंत.
कारण, केवळ माझी बहिण किंवा कुटुंबातील व्यक्ती म्हणून नाही. तर, गेल्या १० वर्षांपासून त्यांनी जी सेवा दिली, ज्या समर्पण भावनेनं काम केलं त्यासाठी, असे पंकजा यांनी म्हटले.