Women's Special 100 Trains 'Best', Bhaubij Gift from CM uddhav thackeray
मुख्यमंत्र्यांकडून भाऊबीज भेट, महिलांसाठी स्पेशल 100 गाड्या 'बेस्ट' By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 01:40 PM2021-11-08T13:40:00+5:302021-11-08T14:03:41+5:30Join usJoin usNext मुंबईमधील महिला प्रवाशांना गर्दीच्या वेळी बेस्टच्या बसमधून सुखद आणि सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी बेस्ट उपक्रमाने 'लेडीज स्पेशल लेडीज फर्स्ट' या तत्वावर 100 बसेस 6 नोव्हेंबरपासून सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकर महिलांना दिलेली ही भाऊबीजेची भेट आहे. मुंबईकर महिलांनी या बसचा वापर मोठ्या प्रमाणात करावा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बेस्ट उपक्रमाकडून 'लेडीज स्पेशल लेडीज फर्स्ट' बस सेवेचा लोकार्पण सोहळा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी उप-महापौर सुहास वाडकर, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा आदी मान्यवर उपस्थित होते. या बस सेवेच्या लोकार्पणानंतर महापौर बोलत होत्या. यावेळी महापौर म्हणाल्या की, गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांना प्रवास करताना अडचणी येतात. गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांसाठी 100 विशेष बस सुरू केल्याने महिला प्रवाशांची अडचण दूर होणार आहे. या बसमुळे महिला प्रवाशांचा प्रवास सुखद आणि सुरक्षित होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाऊबीज म्हणून मुंबईकर महिला प्रवाशांना ही दिलेली भेट आहे, असे महापौरांनी म्हटले. सध्या मुंबईतील विविध भागात या बसेसना महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या बेस्ट उप्रक्रमाचे कौतुकही करण्यात येत आहे. बेस्टच्या या गाड्यांमुळे महिलांची चांगलीच सोय झाली असून गर्दीच्या ठिकाणी होणार त्रास कमी होण्यास मदत होईल. नवीन 100 एसी बस गाड्यांमुळे वातानुकूलित सफर करण्याचा आनंद महिलांना घेता येईल. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही यासंदर्भात ट्विट करण्यात आले असून महिलांना ही भाऊबीजेची भेट असल्याचे सांगण्यात आलंय. Read in Englishटॅग्स :बेस्टमुंबईउद्धव ठाकरेमुख्यमंत्रीमहिलाBESTMumbaiUddhav ThackerayChief MinisterWomen