You have to play a clean match - Sachin Tendulkar
आपल्याला स्वच्छतेची मॅच खेळायची आहे - सचिन तेंडुलकर By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 04:41 PM2017-09-13T16:41:51+5:302017-09-13T16:51:03+5:30Join usJoin usNext मुंबई स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी एकाची नाही. दुस-याकडे बोट दाखवून स्वच्छता होणार नाही. ही सुद्धा एक मॅच आहे. जी आपल्याला खेळायची आहे. सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास नक्कीच बदल दिसेल, असे आवाहन मास्टर ब्लास्टर व खासदार सचिन तेंडुलकर यांनी मुंबईकरांना केले आहे. (छाया - दत्ता खेडेकर) ‘मिशन २४’ अंतर्गत मुंबईतील दुसरी मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या देवनार, गोवंडी विभागासाठी सचिन तेंडुलकर स्वच्छतादूत बनून आला आहेत. या उपक्रमांतर्गत मुंबई महापालिका, मुंबई फर्स्ट आणि अपनालय या संस्थेमार्फत अशा गलिच्छ वस्त्यांमध्ये सार्वजनिक शौचालय, मलनि:सारण अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (छाया - दत्ता खेडेकर) मुंबईतील कच-यापासून मुक्ती हवी असेल तर सर्वांनीच आपापल्या परिसराचे स्वच्छतादूत व्हावे, असे आवाहन सचिनने केले. स्वच्छतादूत म्हणून मला जे काही करता येईल, ते करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे आश्वासनही दिले. (छाया - दत्ता खेडेकर) या मिशनची घोषणा आयुक्त अजय मेहता व सचिन तेंडुलकर यांनी मुंबई महापालिका मुख्यालयात मंगळवारी (दि.12) केली. (छाया - दत्ता खेडेकर) ‘मिशन २४’मध्ये काय? : मुंबईतील एम पूर्व म्हणजेच शिवाजी नगर, गोवंडी या विभागांतील रहिवाशांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी मिशन २४ अंतर्गत प्रयत्न होणार आहेत. दोन वर्षांमध्ये या विभागाचा कायापालट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.टॅग्स :सचिन तेंडूलकरमुंबईमुंबई महानगरपालिकाSachin TendulkarMumbaiMumbai Municipal Corporation