लाखो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:00 AM2018-03-30T01:00:19+5:302018-03-30T01:00:19+5:30
वसमत शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावरून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. ही जलवाहिनी तीन दिवसांपासून फुटली असूनही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : वसमत शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावरून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. ही जलवाहिनी तीन दिवसांपासून फुटली असूनही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे
सिद्धेश्वर धरणामधून वसमत शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदच्या वतीने ही पाईपलाईन टाकली आहे.
यासाठी औंढा नागनाथ येथील जिंतूर फाट्यावर पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकीदेखील बांधण्यात आली आहे.
यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असतानाही तीन दिवसांपासून फुटलेल्या पाईपलाईनकडे दुर्लक्ष होत आहे. ही जलवाहिनी सोमवारी रात्रीपासून फुटली आहे. मात्र तिची दुरुस्ती तर झाली नाही.
साधा तसा प्रयत्नही कोणी केल्याच्या खुणा तेथे दिसत नाहीत.
मागील तीन दिवसांत या पाईप लाईनमधून लाखो लिटर पाणी राष्ट्रीय महामार्गावरून वाहून गेले आहे. यामुळे येणाºया जाणाºया वाहनधारकांची मोठी पंचायत होत आहे.
तरीही वसमत नगर परिषदेला मात्र जाग येत नसल्याचे चित्र आहे.