कोल्हापूर : महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्यावतीने पाणी बिलाची आता जागेवरच वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 05:43 PM2018-01-22T17:43:29+5:302018-01-22T17:47:39+5:30
कोल्हापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्यावतीने पाणीपट्टी आकारणी व वसुली प्रभावीपणे व पारदर्शकपणे राबविण्याच्या अनुषंगाने स्पॉट बिलिंगपाठोपाठ आता जागेवरच वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून काही भागात प्रायोगित तत्त्वावर त्याची सुरुवातही झाली आहे. येणाऱ्या अडचणी, अडथळे लक्षात घेऊन तसेच त्यात सुधारणा करून त्याचा संपूर्ण शहरभर अवलंब केला जाणार आहे.
कोल्हापूर : महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्यावतीने पाणीपट्टी आकारणी व वसुली प्रभावीपणे व पारदर्शकपणे राबविण्याच्या अनुषंगाने स्पॉट बिलिंगपाठोपाठ आता जागेवरच वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून काही भागात प्रायोगित तत्त्वावर त्याची सुरुवातही झाली आहे. येणाऱ्या अडचणी, अडथळे लक्षात घेऊन तसेच त्यात सुधारणा करून त्याचा संपूर्ण शहरभर अवलंब केला जाणार आहे.
सध्या स्पॉट बिलिंग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत सध्या ४४ मीटर रिडर्स यांना अँड्रॉईडबेस मोबाईल व ब्लूटूथ प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सदर मोबाईलद्वारे प्रत्यक्ष जागेवर पाणी मीटरचे छायाचित्र घेऊन पाणीपट्टी आकारणीचे छापील बिल संबंधित ग्राहकास त्वरित देण्यात येत आहेत.
सदरची बिले नजीकच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये भरणा करून घेण्यात येत आहेत. तथापि, नागरिकांच्या सोयीसाठी पाणी बिलाची रक्कम जागेवरच स्वीकारण्याची सुविधा सुरू करण्यात येत असून सध्या शहराच्या काही भागांत प्रायोगिक तत्त्वावर पाणी बिलाची रक्कम स्वीकारण्यासाठी मीटर रिडर यांचे मोबाईलवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गांधी मैदान वॉर्ड कार्यालयाकडील बाबासाहेब निकम (ए व बी वॉर्ड) शिवाजी मार्केट वॉर्ड कार्यालयाकडील प्रथमेश माजगांवकर (सी व डी वॉर्ड) राजारामपुरी वॉर्ड कार्यालयाकडील तुषार पोवार (ई व बी वॉर्ड) कावळा नाका वॉर्ड कार्यालयाकडील किरण सणगर व नरेंद्र पराते (ई वॉर्ड) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
नागरिकांनी संबंधित मीटर रिडर आपलेकडे पाणीपट्टी बिलाची रक्कम स्वीकारण्यास आल्यास त्यांचेकडे पाणी बिलाची रक्कम देऊन रितसर पोहोच पावती घेणेची आहे. या पाच भागात हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून लवकरच संपूर्ण शहरात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने म्हटले