Ganesh Chaturthi 2019 Muhurta (Time) : जाणून घ्या गणपती प्रतिष्ठापनेचा मुहुर्त...!

By appasaheb.patil | Published: August 31, 2019 07:14 PM2019-08-31T19:14:01+5:302019-08-31T19:15:39+5:30

Ganesh Chaturthi Muhurta (Time) : गणपती बप्पा मोरया; सार्वजनिक मंडळांना मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही

10am to 5pm Ganpati Establishment: Panchagakare | Ganesh Chaturthi 2019 Muhurta (Time) : जाणून घ्या गणपती प्रतिष्ठापनेचा मुहुर्त...!

Ganesh Chaturthi 2019 Muhurta (Time) : जाणून घ्या गणपती प्रतिष्ठापनेचा मुहुर्त...!

Next

आप्पासाहेब पाटील

गणपती हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यामुळे गणेशोत्सव तर बाप्पांच्या भक्तांसाठी मोठा सोहळाच, मात्र गणपतीची प्रतिष्ठापना शास्त्रशुध्द पध्दतीने कशी करायची याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते. याशिवाय गणपतीची कधी व कशी प्रतिष्ठापना करायची याबाबत कल्पना नसते़ त्यामुळे सोलापुरातील प्रसिध्द पंचागकर्ते मोहन दाते यांच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद.

प्रश्न - कधी करावी गणेशाची स्थापना व पूजन ?
उत्तर - मागच्यावर्षी विसर्जनाच्या वेळेस आपण केलेल्या पुढच्या वर्षी लवकर या.. या प्रार्थनेनुसार गणपती बाप्पा ११ दिवस लवकर आला आहे़ सोमवार २ सप्टेंबर २०१९ रोजी सोमवारी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी भारतात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी सोमवारी ब्राह्ममुहूतार्पासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५३ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीनी घरातील गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल.

प्रश्न - गौरी आवाहनाबाबत काय सांगाल ?
उत्तर - गुरूवार ५ सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन करावयाचे असल्याने ५ सप्टेंबर रोजी गुरुवारी वैधृती योग असला तरी दिवसभरात केव्हाही गौरी आवाहन करता येईल़ ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन असल्याने शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी शुक्रवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने शनिवार ७ सप्टेंबर गौरी विसर्जन दिवसभरात केंव्हाही करता येईल. काही वेळेस गौरी आवाहन किंवा विसर्जनाकरिता ठराविक वेळेची मर्यादा असते मात्र यावर्षी तसे नाही दिवसभरात कधीही आवाहन आणि विसर्जन करता येईल.

प्रश्न - गणपती विसर्जनाबाबत मुर्हुत कोणता ? 
उत्तर - यावर्षी गुरूवार १२ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. १० दिवसांच्या गणपतींचे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशाचे विसर्जन यादिवशी दिवसभरात केव्हाही करता येईल. पुढील वर्षी २२ आॅगस्ट २०२० रोजी गणेश चतुर्थी आहे.  
-------------
मध्यानंतर देखील करू शकता प्रतिष्ठापना
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सोलापूर शहर व जिल्ह्यात सर्वाधिक संख्या आहे़ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणपती प्रतिष्ठापनेसाठी कुठल्याही मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना मध्यानंतर देखील करता येऊ शकते.
-------------
चांगल्या कार्याची सुरूवात गणेश वंदनानेच होते...
मंगलकार्य किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच श्रीगणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षापासून सुरू आहे.  भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुथीर्ला(गणेश चतुर्थी) घरी गणपतीची मूर्ती आणून, पूजा करून, गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस अथवा अनंत चतुर्दशीपर्यत, पूर्ण दहा दिवस गणपती घरी बसवतात. गणेशोत्सव काळात भक्तीमय वातावरण असते़

Web Title: 10am to 5pm Ganpati Establishment: Panchagakare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.