प्राणायामाविषयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 08:54 PM2018-11-19T20:54:18+5:302018-11-19T20:54:29+5:30

प्राणायाम ही योगी लोकांसाठीच असलेली योगक्रिया आहे, असा एक प्रवाद आहे़ सामान्य माणसाचा तो प्रांत नाही, असा समज आहे़

About Pranayama | प्राणायामाविषयी

प्राणायामाविषयी

Next

- डॉ. विजय जंगम

प्राणायाम ही योगी लोकांसाठीच असलेली योगक्रिया आहे, असा एक प्रवाद आहे़ सामान्य माणसाचा तो प्रांत नाही, असा समज आहे़ ही गोष्ट हास्यास्पद आहे़ अहो, आपण जन्माआधीपासून श्वासोच्छ्वास करतो़ प्राणायामात मुख्य क्रिया, पायाभूत क्रिया श्वासोच्छ्वास हीच आहे़ या क्रियेचे नियंत्रण, नियोजन म्हणजे प्राणायाम़ असं असेल तर ती क्रिया सर्वसामान्यांसाठी नसावी हे असयुक्तिक होईल की नाही?
प्राणायाम म्हणजे नियमानं, नियमित श्वसनक्रिया? अनियमितपणेही क्रिया होऊ शकते, होत असते़ अनियमित श्वसनाने धोके होऊन आजारीपण ते अकाली मृत्यू इथपर्यंतचा दंड सोसावा लागतो़ हे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणूनच चांगली प्राणायामक्रिया शिकून घ्यायची, अंगीकारायची.


‘जेनो काम तेनो थाय’ या गुजराथी म्हणीप्रमाणे तोंडाने खावेप्यावे, बोलावे, नाकाने श्वसन उच्छ्वसन करावे! तोंडाने श्वास घेतल्यानं घशाचे, गळ्याचे, फुप्फुसाचे आजार होऊ शकतात़ नाकामध्ये दूषित हवेला आवश्यक तेवढं शुद्ध केलं जातं. तशी व्यवस्था तोंडात, गळ्यात नसते़ नाकावाटे नियंत्रित श्वास- प्रश्वास केल्यानं होणारी प्राणायामक्रिया आयुष्य वाढविते, निरोगीपणा वाढविते.


संगीताची लयबद्ध लकेर, तान किंवा वाद्यावरची गत ऐकून तुम्हाला बहुश: संतोष वाटतो़ विशिष्ट मात्रेची स्वरकंपनं विशिष्ट नाद करतात़ हे नाद आनंद, उत्साह, सुखद अनुभव देणारे तसेच दु:ख, भय उभे करणारे- वाढविणारे असतात़ लयीसोबत ताल असेल तर साध्या गीताचं संगीत होतं़ तेच तालबद्ध श्वसन-प्रश्वसन केल्यानं होतं. सीत्कारी, भस्त्रिका यांच्या लयबद्ध आवृत्तींमधून एक लयबद्ध संगीत सुरावट ऐकू येते़


आता काही शंकेखोर म्हणतील तुमचा प्राणायाम दहा-पंधरा मिनिटांपुरता, फार फार तर अर्धा तास़ दिवसभराचे तास चोवीस़ अगदी दोनेक तास प्राणायाम केला तरी बाकीच्या बावीस तासांचं काय? त्यावर आम्ही म्हणू पुलावर मंदगतीनं वाहनं चालवावीत अशा सूचना लावतात, त्या का? तर लयबद्ध (विशिष्ट) गतीनं वाहन चाललं तरच पूल त्याचा भार सहन करू शकेल़ तेव्हा तालबद्धतेत विशिष्ट प्रमाणात शक्ती असते़ गरजेहून जास्त पाणी प्यायलात तर पोटाला तडस लागते़ तेव्हा गरजेहून जास्त शक्ती व्यय करू नये़ सुरुवातीला पाच-दहा मिनिटे इतका माफक वेळ प्राणायामासाठी पुरतो, त्यातून शरीर शक्तीसंचय सहन करेल एवढीच शक्ती भरली जाते.

Web Title: About Pranayama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.