सक्रिय आध्यात्मिकता म्हणजे मानवाची सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 04:33 AM2020-05-11T04:33:24+5:302020-05-11T04:33:49+5:30
प्रार्थनेच्या जागा या माणसाच्या बुद्धिमत्तेने निर्माण केलेल्या देव या संकल्पनेचे व निर्मितेचे आदर्श आहेत आणि निर्मिकाच्या गुणांप्रमाणे तेही आपल्या विश्वातून काढून एकता येणार नाहीत.
- स्नेहलता देशमुख
मानवाच्या सेवेपेक्षा कोणताही धर्म अधिक मोठा नाही. सर्वांच्याच भल्यासाठी काम करणे, हीच मोठी श्रद्धा आहे. विसाव्या शतकातील अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन म्हणाले, ‘आज एकविसाव्या शतकात अमेरिकेवर कोरोना विषाणूवर मात करण्याची वेळ आली. लाखो लोकांना सेवेची गरज भासली तेव्हा सक्रिय आध्यात्मिकता म्हणजे मानवाची सेवा, हे सर्वांना पटले. अडचणीच्या वेळी आपल्याकडे मंदिरात जाऊन प्रार्थना करण्याची प्रथा आहे. आता लॉकडाऊनच्या काळात मंदिरे बंद असतात. परंतु, आपलं घर हेच मंदिर समजून आपल्यामध्ये उपजतच असलेल्या आणि जीवनाच्या विविध इंद्रियमय गोष्टी असलेल्या मन:शक्तीचा उपयोग करून शुद्धीचा, ज्ञानाचा आणि सुसुंवादाचा आधार घेऊन खोलवर विचार करत आपण घरात शिरलो, तर घर हेच प्रार्थना स्थळ होते, तेव्हा हे प्रचंड प्रमाणात सिद्ध होते की, सारे काही त्या निर्मिकाच्या इच्छेनुसारच मिळालेले असते.
प्रार्थनेच्या जागा या माणसाच्या बुद्धिमत्तेने निर्माण केलेल्या देव या संकल्पनेचे व निर्मितेचे आदर्श आहेत आणि निर्मिकाच्या गुणांप्रमाणे तेही आपल्या विश्वातून काढून एकता येणार नाहीत. तसेच प्रार्थनेच्या जागा ज्यांनी निर्माण केल्या, त्यांनाही व त्यांच्या गुणांनाही विसरता येणार नाही. थक्क करणारे अक्षरधाम मंदिर ज्यांनी तयार केले, त्यांच्यामध्येही मानवी बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट पण संघटनात्मक कौशल्य कलाकुसर आणि ईश्वराची दृष्टी दिसते. प्रार्थनेची जागा म्हणजे अदृष्टाचे महाद्वार असते. ‘अक्षरधाम’ ही अशीच कलाकृती आहे. एपीजे अब्दुल कलामांनी प्रमुख स्वामींना जेव्हा हे सांगितले की, अक्षरधाम’च्या रूपाने त्यांनी खरोखरच आदर्श स्थान निर्माण केले आहे. तेव्हा ते म्हणाले, ‘हे बघा उत्कृष्टपणाची सांगड तुम्ही बिनचुकपणाशी घालू नका. माणूस उत्कृष्टपणापर्यंत पोहोचू शकतो; पण बिनचुकपणा हे ईश्वराचे काम आहे. म्हणून आज कोरोनावर मात करताना आपण उत्कृष्टपणे काम करतो आहोत. त्याला प्रार्थनेची जोड देऊन कोरोनाच्या अंधारातून प्रकाशाकडे जाऊया. स्वच्छ सुंदर मंदिराची आराधना करूया.