अध्यात्म- जी ले.. जरा..जी भर के रे.. !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 08:30 PM2019-03-02T20:30:58+5:302019-03-02T20:31:45+5:30
वयाच्या ५४ व्या वर्षी श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला.पैसा, प्रसिद्धी,पद,सगळ काही तिच्याकडे होतं.. मित्रांनो... पण मृत्यू कधीही झडप घालतो.जगून घ्या जरा....
- डॉ.दत्ता कोहिनकर
वयाच्या ५४ व्या वर्षी श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला.पैसा, प्रसिद्धी,पद,सगळ काही तिच्याकडे होतं.. मित्रांनो... पण मृत्यू कधीही झडप घालतो.जगून घ्या जरा. *ओशो म्हणतात...सुख का अर्थ है - मुझे जो मिला है, उसमे आनंद लेना, दु:ख का अर्थ है मुझे और और चाहिए...
मित्रांनो.... तृष्णा कधीच पूर्ण होत नसते.त्यामुळे जे आहे त्यात आनंदी रहा व प्रगतीसाठी कर्म करत रहा पण आसक्ती विरहित करा...घरातील लोकांवर भरभरून प्रेम करा.तुटलेले संबंध जोडण्यासाठी पुढे या प्रेम व्यक्त करा. सहलीला जा.कधीतरी सुट्टी काढून आराम करा. आपल्या लाडक्या लेकरांना जवळ घ्या. रोजच्या दैनंदिन कामात खुप व्यस्त असतो आपण ,तरीपण थोडा वेळ आपल्या पत्नीला व मुलांना दया. पत्नीवर असलेले प्रेम व्यक्त करा. आभाळभर कष्ट करुन आपल्याला वाढवलेल्या आपल्या आईवडिलांसाठीही थोडा वेळ काढून त्यांना गोडधोड खाऊ घाला.त्याच्याजवळ बसा त्याच्यासमोर कृतज्ञता व्यक्त करा. चित्रपट पाहण्याची,खाण्यापिण्याची,फिरण्याची,व इतर मनोक्त इच्छा पूर्ण करुन घ्या. सर्वावर प्रेम करा.स्वत: ची काळजी घ्या,स्वत: वरही थोडं प्रेम करा.
एक गोष्ट वाचली होती. एक भिक्षेकरी राजाकडून दान घेताना त्याच्या भिक्षापात्रात कितीही टाकलं तरी ते भिक्षापात्र भरत नव्हतं.कारण ते माणसाच्या मेंदूच्या कवटीपासून बनवलं होतं. तृष्णा संपत नसते.म्हणून जीवनात जे आपल्या जवळ आहे त्यात आनंद मानून जगायला शिका.जीवन खुप सुंदर आहे त्यावर प्रेम करा व आनंदाने जगा
पुढच्या क्षणी श्वास थांबू शकतो.मग या मिळालेल्या क्षणाचा पुरेपुर उपभोग घ्या..इी ऌंस्रस्र८...??