अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तूंची कराल खरेदी तर, कोणत्या वस्तू कराल दान?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 12:52 PM2019-05-06T12:52:20+5:302019-05-06T12:53:06+5:30

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला 'अक्षय तृतीया' म्हणतात. शास्त्रानुसार साडे तीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेला सोनं, गाडी किंवा कपड्यांची खरेदी केल्यास शुभ संकेत मानले जातात.

Akshaya Tritiya 2019 buy these auspicious things according your zodiac sign and donate these things | अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तूंची कराल खरेदी तर, कोणत्या वस्तू कराल दान?

अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तूंची कराल खरेदी तर, कोणत्या वस्तू कराल दान?

Next

(Image Credit : News State)

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला 'अक्षय तृतीया' म्हणतात. शास्त्रानुसार साडे तीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेला सोनं, गाडी किंवा कपड्यांची खरेदी केल्यास शुभ संकेत मानले जातात. तसंच या दिवशी दान केल्यास विविध संकटातून मुक्तता होते, असंही मानलं जातं. अनेक लोक या दिवशी नवीन कामाची सुरुवात किंवा एखाद्या कामाची सुरुवात करतात. यावर्षी अक्षय तृतीया 7 मे रोजी साजरी केली जाणार आहे. 

Akshaya Tritiya 2018: Buy these auspicious things according to your zodiac sign | अक्षय तृतीया 2018: राशि अनुसार इन चीजों की करें खरीदारी, माना जाता है शुभ

अक्षय तृतीयेला राशीनुसार या वस्तूंची करा खरेदी :

मेष राशी - सोन्याच्या वस्तू.

वृषभ राशी - सोनं आणि चांदी दोघांपैकी काहीही खरेदी करू शकता. 

मिथुन राशी - सोन्याच्या वस्तू खरेदी कराव्यात. 

कर्क राशी - सोनं आणि चांदी यांपैकी काहीही खरेदी करू शकता.

सिंह राशी - सोनं आणि चांदीच्या वस्तू खरेदी कराव्यात.

कन्या राशी - सोन्याच्या वस्तू  खरेदी करू शकता.

तूळ राशी - सोनं किंवा चांदिच्या वस्तू खरेदी करण्यासाठी योग्य.

वृश्चिक राशी - सोन्याच्या वस्तू खरेदी करा.

धनू राशी - सोन्याच्या वस्तू खरेदी करणं योग्य.

मकर राशी - सोन्याच्या वस्तू खरेदी करू शकता. 

कुंभ राशी - सोन्याच्या वस्तू खरेदी करा. 

मिन राशी - सोन्याचे दागिने खरेदी करू शकता. 

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं की, या दिवशी दान देणाऱ्या व्यक्तीने दान दिल्या जाणाऱ्या वस्तूची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. असं न केल्यास तुम्हाला त्याचा लाभ मिळत नाही. या दिवसाबाबत अशी मान्यता आहे की, या दिवशी गरजू व्यक्तीला दान दिल्याने आणि अन्न दिल्याने समृद्धी लाभते. या गोष्टी दान करणं ठरतं शुभ... 

1. अक्षय्य तृतीयेला थंड पदार्थांचं दान करावं. फळे, वस्तू किंवा कोणताही थंड पदार्थ दान करणे शुभ मानलं जातं.

2. अक्षय्य तृतीयेला भाग्योदय होण्यासाठी शंखाची खरेदी करा. त्यामुळे लक्ष्मी आणि विष्णू प्रसन्न होतात, असं म्हटलं जातं.

3. अक्षय्य तृतीयेला तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करत असाल, तर पूजा करून त्या वस्तू वापराव्या किंवा तिजोरीत ठेवाव्या.

4. अक्षय्य तृतीयेला अन्नदान, जलदान किंवा वस्त्रदान करा. मानसिक व्याधींपासून आराम मिळू शकतो.

हा आहे पूजा आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त :

7 मे 2019 रोजी, मंगळवारी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार.

पूजेचा शुभ मुहूर्त - सकाळी 5 वाजून 40 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 17 मिनिटांपर्यंत.

सोने खरेदीचा शुभ मुहूर्त - सकाळी 6 वाजून 26 मिनिटांपासून ते रात्री 11 वाजून 47 मिनिटांपर्यंत. 

Web Title: Akshaya Tritiya 2019 buy these auspicious things according your zodiac sign and donate these things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.