आनंद तरंग - आध्यात्माचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 07:12 AM2019-04-03T07:12:27+5:302019-04-03T07:12:39+5:30

डॉ. मेहरा श्रीखंडे आध्यात्मात पहिल्या जागतिक महायुद्धानंतर परत कुतूहल निर्माण झाले. कारण आपल्या मृत्युमुखी पडलेल्या नातेवाइकांचे पुढे काय होते, ...

 Anand Tarang - The History of Spirituality | आनंद तरंग - आध्यात्माचा इतिहास

आनंद तरंग - आध्यात्माचा इतिहास

Next

डॉ. मेहरा श्रीखंडे

आध्यात्मात पहिल्या जागतिक महायुद्धानंतर परत कुतूहल निर्माण झाले. कारण आपल्या मृत्युमुखी पडलेल्या नातेवाइकांचे पुढे काय होते, हे बघण्याची उत्सुकता निर्माण झाली, परंतु या विषयातील कुतूहल पुढे युद्धानंतर जरी कमी झाले, तरीही त्याला असंख्य पाठीराखे मिळाले होते. आध्यात्म या विषयाला इंग्लंडमध्ये पाय रोवायला वेळ लागला. त्याचे कारण म्हणजे चर्चचा विरोध, परंतु आध्यात्मिकतेला लोकांच्या जिज्ञासेने उचलून धरले. कारण त्यामुळे मृत्यूनंतरच्या आयुष्याला पुष्टी मिळत होती. लंडनमध्ये १८८२ साली व अमेरिकेत १८८५ साली क्वसोसायटी फॉर सायिककल रिसर्च या स्थापन झालेल्या संस्थेने याबाबतीत गंभीरपणे संशोधन सुरू केले.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मला दार्जिलिंग व सिक्किम येथे जाण्याचा योग आला. मी हरभजन सिंग या सैन्यातील सैनिकाची एक विलक्षण कथा ऐकली. तो हिमालयाच्या दरीत घसरून खाली खूप खोलवर वाहात असलेल्या नदीत पडला व मेला. हे १९६८ साली घडले. तो पंजाब रायफल्सच्या २६व्या बटालियनमधील होता व कुठेतरी भारत-चीन सरहद्दीवर संरक्षणाचे काम करत होता. काही दिवसांनंतर तिथल्या गाववाल्यांनी हरभजन सिंगचे भूत दिसत असल्याचे सांगितले. काही सैन्यातील सैनिकांनी त्यांना स्वप्नात हरभजन सिंग दिसतो, असेही सांगितले. चीनने भारतावर १९६२ साली नथू-ला-पासमधून आक्र मण केले होते. त्या युद्धात हरभजन सिंगने भाग घेतला होता. चीनच्या सैन्याला नेहमीच वादळी हवामानात तिथे कुणीतरी गस्त घालीत असल्याचे दिसते. ज्यावेळी भारतीयांकडे याची चौकशी केली होती, त्यावेळी भारतीयांनी तिकडे कुणाला पाठविल्याचा इन्कार केला.

Web Title:  Anand Tarang - The History of Spirituality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.