आनंद तरंग - दुहेरी प्राणमय कोष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 06:55 AM2019-01-10T06:55:22+5:302019-01-10T06:56:27+5:30

गूढ शास्त्रानुसार आपली स्थूल शरीरे दोन वेगळ्या, पण एकमेकांत गुंतलेल्या अशा शरीरांनी बनलेली आहेत. एक दाट स्थूल शरीर जे दिसते

Anand wave - double pranic fund | आनंद तरंग - दुहेरी प्राणमय कोष

आनंद तरंग - दुहेरी प्राणमय कोष

Next

मेहरा श्रीखंडे

गूढ शास्त्रानुसार आपली स्थूल शरीरे दोन वेगळ्या, पण एकमेकांत गुंतलेल्या अशा शरीरांनी बनलेली आहेत. एक दाट स्थूल शरीर जे दिसते व दुसरे न दिसणारा प्राणमय कोष. या प्राणमय कोषाला दुहेरी प्राणमय कोष अथवा सूक्ष्म शरीर असे म्हटले जाते व तो एक जडत्व नसलेली स्थूल शरीराची दुसरी प्रतच असते. हे आपल्याला माहीत आहे की, स्थूल शरीर हे भरीव द्रव व वायू यांचे बनलेले आहे, त्याचप्रमाणे प्राणमय कोष हा अणू, अतिसूक्ष्म अणू, उच्च प्राणिक तत्त्व व वस्तू यांनी बनलेला आहे. हे भौतिक शरीर आपल्याला दिसू शकते व पण प्राणमय कोष हा फक्त दूरदृष्टी असणाऱ्यांनाच दिसू शकतो. नावाप्रमाणेच दैवी शरीर हे दैवी वस्तूंचे बनलेले असते व भौतिक शरीरापासून अगदी सहजपणे हे अलग होऊ शकते, परंतु प्राणमय कोषापासून अलग होणे इतके सोपे नसते. दैवी शरीर हे चेतनेचे वाहक होऊन आपल्या विचारांनी प्रचंड वेगात फिरू शकते. हेच दैवी शरीर शरीराबाहेर जाऊन येण्याचा अनुभव, एकाच वेळी दोन ठिकाणी असल्याचा अनुभव देऊ शकते.

हा प्राणमय कोष अत्यंत सूक्ष्मपणे आपल्या संपूर्ण शरीराच्या तब्येतीवर परिणाम करतो. त्याची कार्ये दोन प्रकारची असतात.

१. ते एका शक्ती केंद्रासारखे दोन प्रमुख ऊर्जांसाठी काम करते, ज्या सूर्यापासून निर्माण होतात, असे मानले जाते. या शक्ती म्हणजेच, प्राण (जीवन ऊर्जा किंवा मानसिक सामर्थ्य) व कुंडलिनी (साप अग्निऊर्जा).
२. ती चेतनेचा अवकाशीय व भौतिक शरीरातील पूल असून, दोघांमधल्या दळणवळणासाठी काम करते.
सर्वसाधारण मानवात हा दुहेरी प्राणमय कोष भौतिक शरीरापासून वेगळा काढणे हे सोपे काम नसते, परंतु भौतिक माध्यम असलेल्या माणसांमध्ये ही दोन्ही शरीरे वाटेल त्या वेळी वेगळी होऊ शकतात. जो माणूस भौतिक व भूतयोनीतील जगाशी संपर्क करू शकतो, त्याला माध्यम म्हणतात. माध्यमातील हा वेगळा झालेला प्राणमय कोष खोलीतील भूतयोनीशी संपर्क साधण्यात मोठे कार्य करतो. यात भूतांचे प्रकटीकरण, तरंगणे, टेबल वाजविणे इत्यादी क्रि यांचा अंतर्भाव होतो.

हा प्राणमय कोष प्राणासाठी ऊर्जेचा स्रोत असल्यामुळे ज्या वेळी तो भौतिक शरीरापासून वेगळा होतो, त्या वेळी त्याची ऊर्जा वाहून जाऊन भौतिक शरीराचा मृत्यूही होऊ शकतो. माध्यम प्रयोग झाल्यावर दमतात व त्यांची ऊर्जा कमी होते, त्याचे कारण हेच असते.

 

Web Title: Anand wave - double pranic fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.