देवदूतांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 04:11 AM2019-04-25T04:11:40+5:302019-04-25T04:13:45+5:30
आपण सर्वांनी देवदूतांबद्दल ऐकलेले आहे. आध्यात्मिक पुस्तकात त्यांच्याबद्दल नेहमीच लिहून येते.
- डॉ. मेहरा श्रीखंडे
आपण सर्वांनी देवदूतांबद्दल ऐकलेले आहे. आध्यात्मिक पुस्तकात त्यांच्याबद्दल नेहमीच लिहून येते. ते ईश्वराचे संदेशवाहक व आपल्याला मदत करणारी माणसे आहेत. देवदूत हे प्रकाशीय असून ते जगामध्ये ईश्वराच्या इच्छेचा प्रसार करतात. वलयांकित देवदूतांव्यतिरिक्त आपल्या बरोबर आणखी दोन रक्षण करणारे व मार्ग दाखिवणारे देवदूत असतात व ते आपल्यावर कायम लक्ष ठेवतात. ते अदृश्य असणारे आपले मित्र असून ते आपली मदत करतात व आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात. ते हे सर्व आपल्या दृष्टिआड व आपल्याला कळणार नाही, अशा पद्धतीने करतात. ते आपल्या इच्छेविरुद्ध आपल्या मार्गात पडत नाहीत. जेव्हा आपल्याला त्यांची मदत लागेल त्याचवेळी ते मदतीचा हात पुढे करतात. तुम्हाला त्यांच्याशी संपर्क केल्यावर कधीही एकटे वाटत नाही. तुम्हाला हे कळतं की कुणीतरी तुमच्यासाठी आहे. देवदूत व खाली आलेले शिक्षक यांच्याशी संपर्क साधणे तसे कठीण नाही. विचारा व तुम्हाला ते मिळेल ही गोष्ट इथे बरोबर लागू पडते. ही किल्ली अशी आहे की तुमचा पूर्ण गर्व जाणे व मनाचा ताबा राहणे हे जरुरीचे आहे. सगळ्या कौशल्यांसारखे हेही आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. महत्त्वाची गोष्ट तुमचा विश्वास. जेवढा जास्त विश्वास तेवढेच संपर्क करणे सोपे, असे म्हटले जाते. आध्यात्मावर प्रगाढ विश्वास ठेवला तर ते शक्य होते. देवदूतांसारख्या कल्पना सर्वसामान्यांमध्ये पसरल्या त्यालाही कारण आहे. आपलं दु:ख ऐकणारं, त्याचा विचार करणारं आणि ते देवापर्यंत पोहोचवणारं कुणीतरी आहे, या कल्पनेनंही मानवाचं दु:ख सहन करण्याची तसंच त्याला तोंड देण्याची शक्ती वाढते. म्हणूनच देवदूताची संकल्पना रास्त ठरते.