जीवन जगण्याची कलाः विपश्यना साधना
By Appasaheb.patil | Published: May 4, 2019 02:20 PM2019-05-04T14:20:10+5:302019-05-04T14:22:03+5:30
आपण स्वतःही शांतीपूर्ण जीवन जगणे आणि दुसऱ्यांसाठीही शांततेची निर्मिती करणे अगत्याचे आहे.
आपणा सवार्नाच सुख आणि शांती हवी असते, कारण की आमच्या जीवनांत खरोखरच सुख आणि शांती नसते. आपण सर्वच वेळोवेळी द्वेष, दौर्मनस्य, क्रोध, भय, ईर्षा इत्यादि कारणामुळे दु:खी होतो. आणि जेव्हा आम्ही दु:खी होतो तेव्हा ते आपल्यापुरतेच सीमित ठेवत नाही तर ते दु:ख दुसऱ्याना देखील वाटतो. जेव्हा कोणती व्यक्ती दु:खी होते तेव्हा आसपासचे वातावरण देखील अप्रसन्न बनविते,आणि त्या व्यक्तिच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तिंवर देखील परिणाम होतो. खरोखरच, हा जीवन जगण्याचा योग्य मार्ग नाही.
आपण स्वत:ही शांतीपूर्ण जीवन जगणे आणि दुसऱ्यांसाठीही शांततेची निर्मिती करणे अगत्याचे आहे. शेवटी आपण सामाजिक प्राणी आहोत, आपल्याला समाजात राहावे लागते आणि समाजातल्या अन्य व्यक्तींबरोबर पारस्पारिक संबंध ठेवावे लागतात. अशा स्थितीत आपण शांतीपूर्वक जीवन कसे जगू शकतो? कसे आपण आपल्या आतमध्ये सुख तसेच शांतीचे जीवन जगू शकतो, आणि कसे आपल्या आसपासही शांती आणि सौमनस्याचे, सौहादार्चे वातावरण निर्माण शकतो, जेणेकरून समाजातले अन्य लोकही सुख आणि शांतीचे जीवन जगू शकतील?
आपले दु:ख दूर करण्यासाठी प्रथम आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की आपण अशांत व बेचैन का होतो. ह्याकडे लक्ष देऊन पाहिले तर लक्षांत येईल की जेव्हा मन विकारामुळे विकॄत होऊन जाते तेव्हा ते मन अशांत होऊन जाते. आपल्या मनांत विकारदेखील आहेत आणि त्याचवेळी आपण सुख तसेच शांतीचा अनुभव घेऊ, हे अशक्य आहे.
हे विकार का आणि कसे उत्पन्न होतात? पुन्हा खोलवर शोध घेतल्यास हे स्पष्ट होते की, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला न आवडणारा व्यवहार करते किंवा जे घडते ते आपल्याला आवडत नाही, ह्याची ती प्रतिक्रिया असते. अप्रिय घटना घडतात आणि आपण आंतरिक तणाव निर्माण करतो. मनाप्रमाणे न होण्यामुळे, किंवा मनाप्रमाणे होण्यात काही बाधा येत असेल तर आपण तणावग्रस्त होतो आणि अंतरमनांत गांठी बांधायला सुरूवात करतो.जीवनभर अप्रिय घटना होत रहातात, कधी मनाप्रमाणे होतात, कधी होत नाहीत, आणि आपण जीवनभर प्रतिक्रिया करत राहतो आणि गांठी बांधत राहतो. आपले पूर्ण शरीर तसेच मन इतक्या विकारांनी, इतक्या तणावांनी भरून जाते की आपण दु:खी होऊन जातो.
ह्या दु:खापासून वाचण्याचा एकच उपाय आहे की आपल्या आयुष्यात अप्रिय घटना घडूच द्यायची नाही, सर्वकाही मनाप्रमाणे व्हावे. किंवा आपल्याला अशी शक्ती जागृत करायला हवी, किंवा अशी शक्ती असलेला दुसरा कुणी मदतकर्ता असावा जो नको असणाऱ्या घटना घडूच देणार नाही आणि आपल्याला हवे असलेलेच होत जाईल. परंतु हे अशक्य आहे. जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाही की ज्याच्या सर्व इच्छा सर्वकाळ पूर्ण होतील, ज्याच्या आयुष्यांत सर्व काही आपल्या इच्छेप्रमाणे घडत राहील, अगदी मनाविरूद्ध काहीही न होता. जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये मनाविरुद्ध घटना घडतच राहणार. अशा वेळेस प्रश्न उठतो की, विषम परिस्थिती ऊत्पन्न झाल्यावर आपण अंध प्रतिक्रिया देणे कसे थांबवावे? कसे आपण तणावग्रस्त न होता शांत आणि संतुलित राहू शकू?